China ची सीमेवर पुन्हा कुरघोडी; लडाखच्या सीमेवर हेलीस्ट्रीप

यामधून ६ ते १२ हेलिकॉप्टर एकत्रच तैनात केले जाऊ शकतात. ही जागा उत्तराखंडच्या बाराहोतीहून २०० किमी अंतरावर आहे.

130

चीनकडून (China) भारताच्या सीमेवर अधूनमधून घुसखोरी किंवा कुरघोडी केली जाते. चीनने पुन्हा एकदा असा प्रकार केला आहे. यावेळी लडाखच्या वास्तविक नियंत्रण सीमेजवळ चीनने सहा नवीन हेलीस्ट्रीप उभारण्यास सुरुवात केली आहे. ज्याचा सुगाव भारताला सॅटेलाईट फोटोद्वारे लागला. यावर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

(हेही वाचा Badlapur School Case : बदलापूर आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू, विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल)

ती जागा वेस्टर्न तिबेटमध्ये आहे. लडाखच्या डेमचोकपासून हे हेलीस्ट्रिप १६० किमी अंतरावर आहे, ज्यामुळे धोका आणखी जास्त वाढला आहे. गेयायी नावाच्या जागेवर हे हेलीस्ट्रिप बनवण्यात आलं आहे. याठिकाणी अद्याप बांधकाम पूर्ण झालं नाही. हेलीस्ट्रिप बनवण्याची सुरुवात एप्रिल २०२४ मध्ये झाली होती. इथे ६ हेलीस्ट्रिप तयार केले जात आहेत. यामधून ६ ते १२ हेलिकॉप्टर एकत्रच तैनात केले जाऊ शकतात. ही जागा उत्तराखंडच्या बाराहोतीहून २०० किमी अंतरावर आहे. डेमचोक येथे भारतीय आणि चीनी (China) सैन्यांमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे.चीनचे सैन्य नेहमी वास्तविक नियंत्रण रेषेजवळ हेलिपॅड अथवा बांधकाम करत असते. मागील काही वर्षात सीमेजवळील भागात चीनने रस्त्यांचे जाळे बनवले आहे. भारतानेही लडाखच्या चीन (China) सीमेवर देखरेख वाढवली आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने याठिकाणी जवानांची संख्याही वाढवली आहे. या भागात भारताकडून रस्त्यांचे जाळे पसरवले जात आहे. भारताने अनेक अत्याधुनिक शस्त्रेही या भागात ठेवली आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.