Ayodhya Raam Mandir परिसरात पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

या जवानाच्या मृत्यूमुळे अयोध्या मंदिर परिसरात गोंधळ निर्माण झाला.

206
Ayodhya Raam Mandir परिसरात पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या (Special Security Force) एका एसएसफ जवानाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी, (१९ जून) पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आयजी-एसएसपी घटनास्थळी पोहोचले.( Ayodhya Raam Mandir)

शत्रुघ्न विश्वकर्मा (२५) असे या जवानाचे नाव आहे. ते आंबेडकर नगर येथील रहिवासी होते. बुधवारी, (१९ जून) सकाळी राम मंदिर परिसरात गोळीबार ऐकू आला. त्यावेळी इतर सहकारी सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तिथे शत्रुघ्न रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इतर सैनिकांनी त्याला रुग्णालयात नेले. येथून त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

(हेही वाचा – स्वारगेट ते मंत्रालय Shivneri Bus मंगळवारपासून अटल सेतूमार्गे धावणार, काय आहेत नियम? जाणून घ्या… )

या जवानाच्या मृत्यूमुळे अयोध्या मंदिर परिसरात गोंधळ निर्माण झाला. आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वैयक्तिकरित्या घटनेच्या जागेची तपासणी केली. न्यायवैद्यक पथकही घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण मानले जात आहे. आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.