Amit Shah यांच्या सर्व सभा रद्द! तातडीने दिल्लीला रवाना; कारण आलं समोर

287
Amit Shah यांच्या सर्व सभा रद्द! तातडीने दिल्लीला रवाना; कारण आलं समोर
Amit Shah यांच्या सर्व सभा रद्द! तातडीने दिल्लीला रवाना; कारण आलं समोर

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शाह आज महाराष्ट्रात चार जाहीर सभांना संबोधित करणार होते पण अचानक ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. शाह यांच्या जागी आता स्मृती इराणी (Smriti Irani) या ठिकाणी निवडणूक रॅली घेणार आहेत.

DG CRPF मणिपूरला रवाना
अमित शाह (Amit Shah) हे मणिपूरमधील (Manipur) परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि उच्च अधिकाऱ्यांकडून अपडेट्स घेत आहेत. मणिपूर हिंसाचारामुळे अमित शाह यांच्या सर्व रॅली रद्द करण्यात आल्या आहेत. मणिपूरमधील परिस्थिती पाहून डीजी सीआरपीएफ मणिपूरला रवाना झाले आहेत. तेथे जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन टीम तयार करण्यात येत आहे. कर्फ्यू शिथिल करण्यात आलेल्या मणिपूरमधील काही भागात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता बिष्णुपूर, इंफाळ आणि जिरीबिम भागात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

केंद्र सरकार सक्रिय
केंद्र सरकार (Central Govt) मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून आहे. डीजी सीआरपीएफच्या मणिपूर दौऱ्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकही लवकरच राज्याला भेट देणार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी हिंसक कारवाया करणाऱ्या आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. (Amit Shah)

मणिपूरमध्ये हिंसाचार का झाला?
मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इंफाळमध्ये संतप्त जमावाने मंत्री आणि आमदारांच्या घरांना आग लावली. त्यांची वाहने जाळण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. संपूर्ण भागात सैनिक तैनात करण्यात आले होते. जिरी नदीत तीन मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे संतप्त होऊन लोक मंत्र्यांच्या घरी गेले मात्र मंत्री राज्यात नसल्याचे समजले. यानंतर संतप्त लोकांनी घराची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. (Amit Shah)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.