Aircraft Crashed: हवाई दलाचे Mig -29 लढाऊ विमान कोसळले! स्फोट होऊन भीषण आग

118
Aircraft Crashed: हवाई दलाचे Mig -29 लढाऊ विमान कोसळले! स्फोट होऊन भीषण आग
Aircraft Crashed: हवाई दलाचे Mig -29 लढाऊ विमान कोसळले! स्फोट होऊन भीषण आग

हवाई दलाचं (Indian Air Force) मिग 29 (Mig 29 Aircraft) विमान कोसळल्याची (Aircraft Crashed) धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील (Rajasthan) बारमेरमध्ये (Barmer) हवाई दलाचे (Air Force) मिग 29 विमान कोसळलं आहे. ज्यामध्ये पायलट सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकवस्ती नसलेल्या भागात हा अपघात झाला.

(हेही वाचा-सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या Majhi Ladki Bahin Yojana च्या लाभार्थींसाठी महत्त्वाचे अपडेट)

तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान कोसळलं (Aircraft Crashed) आणि विमानाला मोठा स्फोट होऊन आग लागली आहे. बाडमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, एसपी नरेंद्र सिंह मीना आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेत सुदैवानं वैमानिक सुखरूप बचावल्याचं हवाई दलानं एक निवेदन जारी करत सांगितलं आहे. (Mig 29 Aircraft)

(हेही वाचा-Rajkot Fort : पुतळा दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली)

एसपी नरेंद्र सिंह मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेर उतरलाई एअरबेसजवळ हा भीषण अपघात (Aircraft Crashed) झाला. मिग-29 अपघाताला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा मिग-29 विमान कोसळल्याचे अपघात झाले आहेत. हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटनुसार, “बाडमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, IAF मिग-29 मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला विमानातून बाहेर पडावं लागलं. पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही, कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.” (Mig 29 Aircraft)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.