Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त

91
Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त
Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त

बीएसएफने रविवारी जम्मू-काश्मीरमधील (Jammu News) आरएसपुरा (R S Pura) येथे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, शनिवार आणि रविवारच्या रात्री जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. अंधाराचा फायदा घेत सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या संशयित हालचाली सैनिकांनी पाहिल्या होत्या.

(हेही वाचा-Crime News: मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी! ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त)

सैनिकांनी हलक्या मशीनगनने गोळीबार केला, ज्यामध्ये दहशतवादी शस्त्र सोडून पळून गेला. आज सकाळी परिसराची झडती घेण्यात आली, त्यात एक एके असॉल्ट रायफल, दोन मॅगझिन, 17 राऊंड आणि दोन पिस्तूल, चार मॅगझिन, 20 राउंड जप्त करण्यात आले. (Jammu News)

(हेही वाचा-Crime News: मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी! ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त)

बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री बीएसएफ जवानांनी आरएसपुरा भागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. त्याने सांगितले की अंधाराच्या आडून बीएसएफ जवानांना कुंपणाजवळ घुसखोराची संशयास्पद हालचाल दिसली पण बीएसएफ जवानांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. शनिवारी रात्री उशिरा जेव्हा बीएसएफला एका घुसखोराची सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी लाईट मशीन गनमधून काही राउंड फायर केले. मात्र, शस्त्रे व दारूगोळा सोडून घुसखोर पळून गेला. झडतीदरम्यान जवानांनी सर्व शस्त्रे जप्त केली. (Jammu News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.