Army Soldiers: पूंछ जिल्ह्यात भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्कराचे ३ सैनिक जखमी

19
Army Soldiers: पूंछ जिल्ह्यात भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्कराचे ३ सैनिक जखमी
Army Soldiers: पूंछ जिल्ह्यात भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्कराचे ३ सैनिक जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (Line of Control) (LOC) बुधवारी सकाळी झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्कराचे (Army Soldiers) 3 जवान जखमी झाले.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेंढरच्या मनकोट सेक्टरमधील फगवाडा गली भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैनिकांच्या एक गट अनवधानाने भूसुरुंगावरून चालत गेला. त्यावेळी हा स्फोट झाला. यावेळी जखमी झालेल्या लष्कराच्या २ जवानांना राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Mid Day Meal Scheme : संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली ‘ती’ योजना सरकारने गुंडाळली)

घूसखोरांना अडचण निर्माण करण्यासाठी या भागात भूसुरुंग लावण्यात आले आहेत. कधी कधी पावसामुळे हे भूसुरुंग वाहून जातात. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.