Women police : वांद्रे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या महिला पोलिसांचीच काढली छेड

एका नागरिकाने त्याचा हा व्हिडीओ मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना ट्विटवर टॅग केला आहे यानंतर आता वांद्रे रेल्वे पोलीस या आरोपीला अटक करण्याच्या तयारीत आहेत.

40
Women police : वांद्रे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या महिला पोलिसांचीच काढली छेड

मुंबईचा अविभाज्य भाग असणाऱ्या लोकलमधून प्रवास करतांना किंवा रेल्वे स्थानकांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज असतात. मात्र काही माणसांकडून पोलिसांचा अपमान केला जातो. अशातच मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला पोलिसांची (Women police) काही तरुणांनी छेड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हेही वाचाCrime : उल्हासनगरमध्ये डॉक्टरनेच मांडला नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा बाजार)

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकात रील करणाऱ्या तरुणांकडून लोकलच्या दरवाजात उभे राहून स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना (Women police) अश्लील भाषेचा वापर करून छेडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यासंबंधीची (Women police) एक तक्रार वांद्रे रेल्वे पोलिसांना करण्यात आली असून, रील बनवणाऱ्या आणि महिलांना छेडणाऱ्या आरोपीचा वांद्रे रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.

हेही पहा – 

दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एका उनाड तरुणाने हा व्हिडीओ (Women police) बनवला.

एका नागरिकाने त्याचा हा व्हिडीओ मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना ट्विटवर टॅग केला आहे यानंतर आता वांद्रे रेल्वे पोलीस या आरोपीला अटक करण्याच्या तयारीत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.