Indigo च्या विमानात महिलेचा विनयभंग

194
Indigo च्या विमानात महिलेचा विनयभंग

इंडिगोच्या (Indigo) विमानात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका 43 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दिल्लीहून चेन्नईला जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

(हेही वाचा – Cyber Fraud : पंढरपुरातील भक्तनिवासाच्या नावे खोटी आगाऊ नोंदणी)

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, इंडिगो (Indigo) फ्लाइटमध्ये आरोपी राजेश शर्मा तिच्या मागे बसला होता. महिलेने सांगितले की, ती झोपली असताना त्याने तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. खिडकीच्या शेजारी आणि आरोपी पुरुष तिच्या मागे होता. फ्लाइट चेन्नईत उतरल्यानंतर 4.30 वाजता शर्माने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

(हेही वाचा – Mahadev Betting App : सौरभ चंद्रकारला दुबईहून अटक)

भारतीय दंड संहिता (लैंगिक छळ) च्या कलम 75 अंतर्गत नोंद करण्यात आली आणि आरोपीला नंतर अटक करण्यात आली, अधिकारी म्हणाले की, आरोपी राजस्थानचा रहिवासी आहे, परंतु तो बऱ्याच काळापासून चेन्नईमध्ये राहतो. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Indigo)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.