Whale’s vomit : ६ कोटी २० लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त! तिघांना अटक, आरोपी उलटीचं काय करतात?

224
Whale's vomit : ६ कोटी २० लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त! तिघांना अटक, आरोपी उलटीचं काय करतात?
Whale's vomit : ६ कोटी २० लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त! तिघांना अटक, आरोपी उलटीचं काय करतात?

व्हेल माशाची तब्बल 6 कोटी 20 लाख रुपयांची उलटी (Whale’s vomit) पोलिसांनी कल्याणमध्ये जप्त केली आहे. व्हेल माशाची उलटी (Whale vomit) विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कल्याण (Kalyan) क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्यात. अनिल भोसले, अंकुश माळी, लक्ष्मण पाटील अशी तिघा आरोपींची नावे आहेत. तिघे पनवेल परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याजवळून सुमारे 6 कोटी 20 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी उलटी (Whale’s vomit) कुठून आणली? कुणाला विक्री करण्यासाठी आणली? याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे.

नेमकं काय घडलं?
व्हेल माशाची उलटीची (Whale’s vomit) अनधिकृतरित्या विक्री करण्यासाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवर सापळा रचला. संशयित गाडी दिसताच गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये व्हेल माशाची उलटी (Whale’s vomit) आढळली. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्काळ गाडी मधील अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील या तिघांना ताब्यात घेत अटक केली.

आरोपी उलटीचं काय करतात?
व्हेल माशाची उलटी (Whale’s vomit) ही अत्यंत दुर्मिळ असून, ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी वापरतात. नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. तसेच ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकार वाढले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.