Weapon seized : निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमधून ९ रायफल, ५८ काडतुसे जप्त

93

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Election 2024) प्रचारसभा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये बनावट शस्त्र परवान्यांच्या नावाखाली शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जम्मू-काश्‍मिरच्या (Jammu and Kashmir) नऊ जणांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून ९ रायफल आणि ५८ काडतुसे जप्त करण्यात आली आहे. (Weapon seized)

(हेही वाचा – ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही…’,Eknath Shinde यांचं मोठं वक्तव्य; राहुल गांधींना दिलं आव्हान)

अहिल्यानगरमध्ये सुरक्षारक्षकच निघाले आरोपी

अहिल्यानगरमधून बनावट शस्त्र (fake weapon) परवान्यांच्या नावाखाली जम्मू व काश्मिर राज्यातील काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर शहर व आजूबाजूच्या शहरात सुरक्षा रक्षक (security guard) म्हणून नोकरी करीत आहेत.त्यांच्याकडून १२ बोअरच्या नऊ रायफली व ५८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या (पुणे) पथकाने ही कारवाई केली. (Weapon seized)

(हेही वाचा – Kirit Somaiya यांची पवारांवर टीका; म्हणाले, शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते की…)

मिळलेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलिस व दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणी छापे टाकून नऊ आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी जम्मू-काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यातील आहेत. तसेच आरोपींकडे असलेल्या शस्त्र परवान्यांची खात्री केली असता असे कोणतेही शस्त्र परवाने दिले नसल्याचे जम्मू- काश्मिरमधील राजौरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार या आरोपींच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.