जिहाद्यांचे समर्थन करणारा स्वयंघोषित पत्रकार Wajid Khan याला अटक

237
जिहाद्यांचे समर्थन करणारा स्वयंघोषित पत्रकार Wajid Khan याला अटक
जिहाद्यांचे समर्थन करणारा स्वयंघोषित पत्रकार Wajid Khan याला अटक

इस्लामी आतंकवादाचे समर्थन करणारा आणि सातत्याने हिंदुद्वेषी मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करणारा स्वयंघोषित पत्रकार वाजिद खान याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. वाजिद खान (Wajid Khan) वारंवार हिंदू (Hindu) आणि ज्यू समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्यासंदर्भातील लेखन त्याने समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. त्यात दि. ८ ऑक्टोबर रोजी हमासच्‍या आतंकवाद्यांनी इस्रायलवर (Israel) केलेल्‍या आक्रमणाला १ वर्ष झाले असताना खान याने या आक्रमणाचे उदात्तीकरण केले.

(हेही वाचा : Child Sexual Abuse : मुलींनो अत्याचार सहन करू नका; सत्रन्यायाधिशांचे आवाहन)  

दरम्यान जिहादी मानसिकतेच्या आतंकवाद्यांच्या विरोधात इस्त्रायलच्या पाठिशी उभ्या असलेल्या हिंदूंविषयी (Hindu) समाजमाध्यमांवर खान वारंवार गरळ ओखत होता. तसेच दि. ४ ऑक्टोबर रोजी वाजिद खान (Wajid Khan) याने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करण्याचा दाव करत महंत यति नरसिंहानंद आणि त्‍यांचे अनुयायी यांना जिवे मारण्‍याची धमकी दिली आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजिद खान हा राजस्‍थानमधील अजमेर जिल्‍ह्यातील गवाना येथील रहिवासी आहे; मात्र राजस्‍थानमध्‍ये भाजपची सत्ता आल्‍यानंतर त्‍याने तो अमेरिकेत वास्‍तव्‍य करत असल्‍याचे म्‍हटले होते. तसेच वाजिद (Wajid Khan) आपल्या एक्स अकाऊंटवर स्वत: ची ओळख ‘आखाती देशातील अल् जझिरा’ या प्रसारमाध्‍यमामध्‍ये स्‍तंभलेखक म्‍हणून कार्यरत असल्याचे सांगत आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.