भारतात बंदी असलेल्या IMO App चा घुसखोर बांगलादेशीयांकडून वापर

102
भारतात बंदी असलेल्या IMO App चा घुसखोर बांगलादेशीयांकडून वापर
  • मुंबई 

भारतात बंदी असलेल्या ‘आयएमओ’ (IMO) या मोबाईल मेसेंजर अॅप्लिकेशनचा घुसखोर बांगलादेशीयांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मुंबई तसेच मिरारोड येथे अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशीयांच्या मोबाईल फोनमध्ये भारतात बंदी असलेले ‘आयएमओ’ हे अॅप्लिकेशन मिळाले असून त्याचा वापर बांगलादेशात राहणाऱ्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी तसेच बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून पाकिस्तानमधील लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १४ मोबाईल मेसेंजर अॅप्लिकेशनवर (IMO App) मे २०२३ मध्ये भारतात बंदी आणण्यात आली आहे. त्यात क्रिपवाइझर, एनिग्मा, सेफस्विस, विक्रम, मीडियाफायर, ब्रायर, बीचॅट, नँडबॉक्स, कोनियन, आयएमओ, एलिमेंट, सेकंड लाइन, झांगी आणि थ्रीमा या अॅप्लिकेशनचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने या बेकायदेशीर अॅप्लिकेशनचा वापर भारताच्या बाहेर मेसेजेस् पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता, हे अॅप्लिकेशन सर्वाधिक दहशतवादी संघटनेकडून वापरले जात होते.

(हेही वाचा – Assembly Election : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निशाण्यावरती नितेश राणेच का ?)

भारताने या मोबाईल या अॅप्लिकेशनवर बंदी आणलेली असताना बंदी असलेल्यापैकी काही अॅप्लिकेशन्स अद्याप बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी तसेच बेकायदेशीर देवाणघेवाण करण्यासाठी लपून छपून वापरले जात आहेत. बंदी असलेल्या अॅप्लिकेशन्सपैकी ‘आयएमओ’ (इमो) (IMO App) हे मोबाईल मेसेंजर अॅप्लिकेशन भारतात घुसखोरी आणि बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशीयांकडून मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई आणि मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे.

मीरा रोड येथील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेनकर पाडा येथून गुन्हे शाखेने जावेद रोहमान शेख (३५) या बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. जावेद हा मूळचा बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यातील दिघोलीया येथे राहणारा आहे, त्याचे सर्व कुटुंब बांगलादेशात राहण्यास आहे. पोलिसांनी जावेद याचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन तपासला असता त्यात पोलिसांना आयएमओ (इमो) (IMO App) हे भारतात बंदी असलेले अॅप्लिकेशन आढळून आले. त्याच्याकडे या अॅप्लिकेशनबाबत चौकशी केली असता बांगलादेशात राहणाऱ्या नातलग आणि कुटुंबासोबत बोलण्यासाठी ह्या अॅप्लिकेशनचा वापर करीत असल्याची माहिती त्याने दिली. या अॅप्लिकेशनवरून त्याने संशयितांना कॉल केला का? याचा तपास सुरू आहे.

(हेही वाचा – Versova-Madh Bridge : वर्सोवा ते मढ दरम्यान केबल स्टे आधारित पूल, आता दीड तासांऐवजी केवळ २० मिनिटांमध्ये होणार प्रवास)

मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या बांग्लादेशी नागरिकांच्या मोबाईल फोनमध्ये आयएमओ हे अॅप्लिकेशन मिळाले आहे. बांगलादेशात राहणाऱ्या कुटुंबासोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्यासाठी या अॅप्लिकेशनचा (IMO App) वापर करीत असल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाने पोलिसांनी दिली आहे. भारतात बेकायदेशीर राहत असल्याचे उघडकीस येऊ नये यासाठी मुंबई आणि ठाणे, पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या अॅप्लिकेशनचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.