UP Police: पोलीस उपअधीक्षकाचा झाला कॉन्स्टेबल; नेमकं कारण काय?

सीओ कृपाशंकर कनोजिया यांना महिला कॉन्स्टेबलसह हॉटेलमध्ये पकडण्यात आले. जुलै 2021 मध्ये सुट्टी घेतल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. उन्नावचे तत्कालीन सीओ कृपाशंकर कनोजिया यांनी 6 जुलै 2021 रोजी कौटुंबिक कारणांमुळे एसपी उन्नावकडे रजा मागितली होती. मात्र रजा मंजूर झाल्यानंतर तो घरी न जाता दुसरीकडे कुठेतरी निघून गेला.

395
UP Police: पोलीस उपअधीक्षकाचा झाला कॉन्स्टेबल ; नेमकं कारण काय?
UP Police: पोलीस उपअधीक्षकाचा झाला कॉन्स्टेबल ; नेमकं कारण काय?

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Police) उन्नावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची पदावनत करण्यात आले आहे. त्यांना थेट पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police to Police Constable) पदावरून हवालदार बनवण्यात आले आहे. उन्नावचे तत्कालीन सीओ कृपा शंकर कनोजिया यांच्या कृतीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळत चालली होती. अशा परिस्थितीत त्यांची पदावनती अधिकारी ते हवालदार करण्यात आली आहे. (UP Police)

बढती मिळालेले अधिकारी कृपाशंकर कनोजिया (Kripashankar Kanojia), यांना सीओ बिघापूर, उन्नाव येथे कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी कानपूरच्या एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते आणि त्यांची इन्स्पेक्टर पदावरही पदावनती करण्यात आली . (UP Police)

(हेही वाचा – निसर्गाचे विलोभनीय दृश्य पहायचे आहे ?; Chandoli National Park ला भेट द्या !) 

त्यानंतर विभागीय चौकशीत कृपाशंकर दोषी आढळल्यावर हवालदार पदावर पाठवण्याचे आदेश सरकारने डीजीपी मुख्यालयाला दिले. शनिवारी,अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्या सूचनेनुसार, त्यांना गोरखपूरच्या 26 व्या कॉर्प्समध्ये परत हवालदार बनवण्यात आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी रजा मागितली नेमका गेले कुठे? 

अहवालानुसार, कृपा शंकर कनोजिया (Kripashankar Kanojia) यांनी 6 जुलै 2021 रोजी उन्नाव पोलीस अधीक्षकांकडे कौटुंबिक समस्यांचे कारण देत रजा मागितली होती. रजा मंजूर झाल्यानंतर कृपा शंकर घरी गेले नसून, कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत थांबला होता. यावेळी त्यांनी आपले सरकारी आणि खाजगी मोबाईल नंबर बंद केले होते. नंबर बंद असल्याने पत्नी काळजीत पडली. त्यांनी पोलीस कार्यालयात चौकशी केली असता ते रजा घेऊन घरी गेल्याचे समजले, मात्र घरी पोहोचले नाही. यावर पत्नीने उन्नाव एसपीकडे मदत मागितली. (UP Police)

 (हेही वाचा – Domicile Certificate : रहिवासी प्रमाणपत्र कशासाठी लागते ?; जाणून घ्या सविस्तर)

सीओ कृपा शंकरचा शोध घेण्यासाठी उन्नाव पोलिस अधिक्षकांनी पाळत ठेवणाऱ्या टीमकडून माहिती गोळा केली. यावेळी कानपूरमधील एका हॉटेलमध्ये असून, सीओ शंकर कनोजिया यांचा मोबाईल फोन बंद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी हॉटेलची तपासणी केली असता सीओ आणि लेडी कॉन्स्टेबल एकत्र आढळून आले. सीओ कृपा शंकर आणि महिला कॉन्स्टेबल हॉटेलमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. 

या घटनेनंतर उन्नाव पोलिसांनी याप्रकरणाचा सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर सरकारने तीन वर्षांनंतर त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावरून पोलीस शिपाई पदावर पदानवत करण्याची शिफारस केली. सरकारच्या या शिफारशीनंतर आता अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. (UP Police)

हेही वाचा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.