Crime : उल्हासनगरमध्ये डॉक्टरनेच मांडला नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा बाजार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहक बनून या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला आहे.

147

उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टर नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने लहान मुलांच्या खरेदी -विक्रीचा जणू बाजारच मांडला होता. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होममधील डॉक्टर चित्रा चैनानी या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळांची खरेदी-विक्री करत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहक बनून या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या २२ दिवसांच्या बाळाला सात लाखांना डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे रेट या महिला डॉक्टरने ठरविले होते. आज २२ दिवसांच्या बाळाची विक्री ७ लाखात होणार होती. दरम्यान महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या बाळाची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये सहभागी आहे. सध्या महिला बालकल्याण विभाग आणि क्राईम ब्रँच अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत असून लवकरच एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे.

(हेही वाचा Central Vista : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी होणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.