Threatening Phone Call : भाजपाच्या ‘या’ नेत्यांना पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल

144
Threatening Phone Call : भाजपाच्या ‘या’ नेत्यांना पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल
Threatening Phone Call : भाजपाच्या ‘या’ नेत्यांना पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल

बिहार भाजपाचे नेते तथा खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Union Minister Giriraj Singh)  यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गिरीराज सिंह यांचे खासदार प्रतिनिधी असलेले अमरेंद्र कुमार अमर (Amarendra Kumar Amar) यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप कॉल करून ही धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधून व्हॉट्सॲप कॉल करून गिरीराज सिंह आणि मला शिवीगाळ करण्यात आली. तसेच, गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली, असे अमरेंद्र कुमार अमर यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Threatening Phone Call)

(हेही वाचा – नमो आरोग्य शिबिरांमार्फत BJP करणार मुंबईची बांधणी, मुंबईकरांच्या आरोग्याची घेणार काळजी)

बेगुसराय मुख्यालयाचे डीएसपी म्हणाले की, वकील आणि खासदार प्रतिनिधी अमरेंद्र कुमार अमर (Amarendra Kumar Amar) यांनी व्हॉट्सॲपवर शहर पोलिस स्टेशनला एक अर्ज दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, त्यांच्या फोनवर पाकिस्तानमधून व्हॉट्सॲप कॉल (Threatening Whatsapp Call) आला होता. या कॉलमध्ये बेगुसरायचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि त्यांचे खासदार प्रतिनिधी अमरेंद्र कुमार अमर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Monkeypox Virus च्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून जनजागृतीसाठी सूचना)

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे असून, स्थानिक पोलिस ठाण्याव्यतिरिक्त सर्व यंत्रणाही सक्रिय झाले  आहेत. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.