विमानात Bomb ठेवल्याची धमकी देणारा ‘मास्टरमाईंड’ निघाला एका पुस्तकाचा लेखक

149
विमानात Bomb ठेवल्याची धमकी देणारा 'मास्टरमाईंड' निघाला एका पुस्तकाचा लेखक
विमानात Bomb ठेवल्याची धमकी देणारा 'मास्टरमाईंड' निघाला एका पुस्तकाचा लेखक

गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवांमुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झाला. तसेच विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले होते. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी बॉम्बस्फोटांची धमकी देणाऱ्याची ओळख पटवली आहे. जगदीश उईके (Jagdish Uikey) असे या आरोपीचे नाव असून सध्या हा आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२६ ऑक्टोबरपर्यत १३ दिवसांत देशातील विमान कंपन्यांच्या ३०० हून अधिक विमानांत बॉम्ब स्फोट ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यातील अनेक धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. तसेच दि. २२ ऑक्टोबर रोजी इंडिगो आणि एअर इंडियाच्या प्रत्येकी १३ फ्लाइटसह सुमारे ५० फेऱ्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. या सततच्या धमक्यांमुळे अनेक उड्डाणांना उशीर होत आहे. त्याचबरोबर विमानतळ आणि इतर आस्थापनांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परंतु, आता नागपूर पोलिसांनी या धमक्या देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे.जगदीश उईके (Jagdish Uikey) असे नाव असून त्याला २०२१ मध्ये एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.(Bomb)

जगदीश उईके एका पुस्तकाचा लेखक

विशेष म्हणजे उईकेने (Jagdish Uikey) यापूर्वीच दहशतवादावर एक पुस्तकही लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव ‘आतंकवाद एक तुफानी राक्षस’ असे आहे. पोलिसांना त्यांची ओळख पटल्यानंतर जगदीश उईके हा सध्या फरार आहे. पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात उईके याच्या ईमेलशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगदीश उईकेने पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एअरलाइन्स कार्यालये, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यासह विविध सरकारी संस्थांना ईमेल पाठवले होते.(Bomb)

दुसरीकडे, एका गुप्त कोडची माहिती न दिल्यास ठार मारले जाईल, अशी धमकी देणारा ईमेल उईके यांनी पाठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली होती. उईकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून दहशतवादी धोक्यांबाबत त्याच्याकडे असलेल्या माहितीवर चर्चा करण्याची विनंती केली. उईकेने २१ ऑक्टोबर रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आरपीएफला पाठवलेल्या ईमेलनंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. दरम्यान, उईकेला अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी सांगितले. (Bomb)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.