Surat Ganesh Mandap : सूरतमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करणाऱ्यांवर ‘बुलडोझर’ कारवाई

236
Surat Ganesh Mandap : सूरतमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करणाऱ्यांवर ‘बुलडोझर’ कारवाई
Surat Ganesh Mandap : सूरतमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करणाऱ्यांवर ‘बुलडोझर’ कारवाई

गुजरातमधील सुरत येथील सय्यदपुरा (Syedpura, Surat) भागातील गणेश मंडळावर रविवारी (8 सप्टेंबर) रात्री दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीच्या घटनेनंतर सुरत पोलिसांनी 30 हून अधिक लोकांना अटक केली आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) सुरत महानगरपालिकेने (Surat Municipal Corporation) सय्यदपुरा पोलीस चौकी परिसरात आरोपी आणि इतरांच्या बेकायदेशीर बांधकामांविरोधात बुलडोझर (Surat Bulldozer action against illegal constructions) मोहीम राबवली. तसेच पोलीस दलाच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली. सूरत महानगरपालिकेच्या पथकाने 2-3 जे. सी. बी. मशीनचा वापर करून अवैध अतिक्रमण हटवले आणि परिसरातील स्टॉल्स आणि गाड्या बुलडोझर मार्फत काढून टाकल्या. (Surat Ganesh Mandap)

डी. सी. पी. राजदीप सिंग (D. C. P. Rajdeep Singh) म्हणाले की, सोमवारी सुरत महानगरपालिकेच्या पथकाने सय्यदपुरा पोलीस चौकीच्या आसपासच्या अतिक्रमण मालमत्ता हटवण्याची कारवाई सुरू केली. या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेच्या कामकाजात कोणताही अडथळा किंवा व्यत्यय येणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच गृह राज्यमंत्री हर्ष संघवी (Minister of State for Home Harsh Sanghvi) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात पोहोचले. पत्रकार परिषदेत त्यांनी दगडफेक करणाऱ्यांचा निषेध केला. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, मुस्लिम समुदायाला त्यांच्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आणि मदरसे आणि मशिदींसह धार्मिक संस्था त्यांचे समुपदेशन करतील अशी आशा व्यक्त केली.

(हेही वाचा – CM Shinde: पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास, हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल!)

हर्ष संघवी म्हणाले, “मी हे स्पष्ट केले आहे की दगडफेक करणारा केवळ कायद्याचा गुन्हेगार नसतो, तर तो कोणत्याही समुदायाचा असला तरी तो सामाजिक गुन्हेगार आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही दया दाखवण्यात येणार नाही. युवकांना मार्गदर्शन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मग ते मदरशाद्वारे असो, मशिदीद्वारे असो किंवा इतर संघटनांद्वारे असो. जर एखादा तरुण भ्रष्ट मार्गावर जात असेल तर त्याला योग्य मार्गावर आणले पाहिजे. दगडफेकीत सहभागी असलेल्या कोणत्याही समाजातील व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, ते पुढे म्हणाले की, तपास सुरू आहे. दरम्यान, सुरतचे पोलीस आयुक्त अनुपमसिंह गेहलोत (CP Anupam Singh Gehlot) यांनी काल रात्री सुरतमधील सय्यदपुरा येथे दगडफेकीची माहिती दिली. परिसराबाहेरून आलेल्या असामाजिक घटकांनी रिक्षांवर दगडफेक केली, असे ते म्हणाले. या घटनेत 12 ते 13 वयोगटातील सहा मुलांचा समावेश होता, ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Surat Ganesh Mandap)

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बहुतांश संशयितांची ओळख पटली असून रात्रभर चाललेल्या शोधमोहिमे दरम्यान 28 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एक बाल कायद्यांतर्गत येतो आणि पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करणे आणि वाहनाला आग लावणे या आरोपांचाही समावेश करण्यात आला आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता परिस्थिती शांत आहे आणि स्थानिकांना कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.