Suicide News: कामाच्या अतिताणामुळे आणखी एकाने स्वतःला शॉक देत केली आत्महत्या!

131
Suicide News: कामाच्या अतिताणामुळे आणखी एकाने स्वतःला शॉक देत केली आत्महत्या!
Suicide News: कामाच्या अतिताणामुळे आणखी एकाने स्वतःला शॉक देत केली आत्महत्या!

चेन्नईत एका तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या (Suicide News) केल्याची माहिती मिळते आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका २६ वर्षीय तरुणीचा कामाच्या अतिताणाने मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

मूळचा तामिळनाडमधील थेनी जिल्ह्यातील कार्तिकेयन त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह चेन्नईत राहत होता. त्याला १० आणि ८ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. कामाच्या अतिताणामुळे कार्तिकेयन अस्वस्थ होता. तो नैराश्येत गेल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते, असं पोलिसांनी सांगितलं. (Suicide News)

नेमकं काय घडलं?
घटनेच्या वेळी कार्तिकेयन एकटाच घरी होती. त्याची पत्नी के. जयरानी सोमवारी चेन्नईपासून ३०० किमी अंतरावरील थिरुनाल्लूर मंदिरात गेली होती. जाताना तिने तिच्या मुलांना आईकडे सोडलं होतं. गुरुवारी रात्री ती घरी परतली. तिने दरवाजा ठोठावला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अतिरिक्त चावीने तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडाच तिला समोर तिच्या पतीचा मृतदेह दिसला. पतीने शरीराभोवती करंट असलेली वायर गुंडाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. (Suicide News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.