Sexual Assaulted : मदरसामध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपी ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू

175
Sexual Assaulted : मदरसामध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपी ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू
  • प्रतिनिधी

कांदिवली येथील मदरसामध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन जणांनी लैंगिक अत्याचार (Sexual Assaulted) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अनैसर्गिक बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून १६ वर्षाच्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १३ वर्षाचा मुलगा मदरसामध्ये शिकण्यासाठी होता, पीडित मुलगा मदरसा मध्येच शिक्षण घेऊन तेथेच राहण्यास होता, त्याची आई आठवड्यातून एकदा मुलाला भेटायला जात होती. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलाची आई मुलाला भेटण्यासाठी गेली असता त्याने त्याच्यावर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराची (Sexual Assaulted माहिती आईला सांगितली. मुलासोबत होत असलेल्या या प्रकारामुळे आईला धक्काच बसला, तीने तात्काळ कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

(हेही वाचा – Water Supply : पवईतील ‘त्या’ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा होणार सुरळीत)

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पीडित मुलाची वैद्यकीय चाचणी केली असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assaulted झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पीडित मुलाला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, २६ मे रोजी एका १६ वर्षाच्या आरोपीने त्याच्यावर अतिप्रसंग केला, व याबाबत कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या पीडित मुलाने याची वाच्यता कुठे केली नाही, २१ ऑगस्ट रोजी दुसऱ्या एका आरोपीने त्याच्यासोबत हेच कृत्य केले, त्याच्यावर होणाऱ्या अतिप्रसंगाच्या घटनेने घाबरलेल्या पीडित मुलाने आई भेटायला आल्यानंतर मला इकडे राहायचे नाही घरी घेऊन चल असा हट्ट केला. आईने त्याच्याकडे कारण विचारले असता त्याने त्याच्यावर ओढवलेला प्रसंग आईला सांगितला, त्या नंतर मदरसा मधील संतापजनक प्रकार समोर आला आहे.

कांदिवली पोलिसांनी अनैसर्गिक बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून १६ वर्षाच्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीना इतर मुलासोबत असा प्रकार केला आहे याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी मदरसामध्ये शिकणाऱ्या इतर अल्पवयीन मुलांकडे चौकशी करण्यात येत असून त्याच्यावर असा अतिप्रसंग झाला आहे का याची खात्री करण्यात येत आहे. (Sexual Assaulted

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.