सांगलीत भरदिवसा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

49

सांगलीत नगरसेवकाच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञात आरोपींनी कारवर हल्ला चढवला होता. विजय ताड यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जत तालुक्यातील सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवर असणाऱ्या अल्फान्सो स्कूल येथे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची इनोव्हा गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात ताड जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरुन केला आहे, हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

(हेही वाचा H3N2 इनफ्लूएंझावर औषधे नाहीत, काळजी घ्या! आरोग्यमंत्र्यांचे आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.