Sanatan Dharma : तिरुपती प्रसादाच्या लाडूत भेसळ उघड होताच पवन कल्याण, म्हणाले…

424
Sanatan Dharma : तिरुपती प्रसादाच्या लाडूत भेसळ उघड होताच पवन कल्याण, म्हणाले...
Sanatan Dharma : तिरुपती प्रसादाच्या लाडूत भेसळ उघड होताच पवन कल्याण, म्हणाले...

आंध्र प्रदेश येथील भगवान व्यंकटेश्वराचे तिरुपती तिरुमला बालाजी मंदिर (Tirumala Balaji Temple) जगप्रसिद्ध आहे. मात्र तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात गोमांस, डुकराची चरबी आणि फिश ऑईल आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. दरम्यान या प्रसादमध्ये भेसळ असल्याची पुष्टी झाली आहे. प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली आहे. सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने (TDP) दावा केला आहे की गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेने या भेसळीची पुष्टी केली आहे. (Sanatan Dharma)

प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी गोमांस चरबी, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा अशा अपवित्र वस्तूंचा वापर केला जात असल्याचं टीडीपीनं म्हटलं आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyans) यांनी सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर सांगितले की, “तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याने आम्ही सर्वजण खूप त्रस्त आहोत. तत्कालीन वायसीपी सरकारने टीटीडीची स्थापना केली होती. मंडळ कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध आहे, परंतु मंदिरे आणि इतर धार्मिक प्रथा यांच्या अपवित्रतेशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकते. (Sanatan Dharma)

(हेही वाचा – Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक!)

ते पुढे म्हणाले, “आता राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ (National level Sanatan Dharma Rakshak Mandal) स्थापन करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, प्रसारमाध्यमे आणि यावर राष्ट्रीय स्तरावर आपापल्या क्षेत्रातील इतर सर्व लोकांनी चर्चा करावी आणि मला वाटते की आपण सर्वांनी एकत्र येऊन ‘सनातन धर्माचा’ (Sanatan Dharma) कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवला पाहिजे.” असे विधान पवन कल्याण यांनी केला. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.