Conversion : शोएबचा हिंदू महिलेवर धर्मांतरासाठी दबाव, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

358
Conversion : शोएबचा हिंदू महिलेवर धर्मांतरासाठी दबाव, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप
Conversion : शोएबचा हिंदू महिलेवर धर्मांतरासाठी दबाव, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

उत्तराखंडच्या (Uttarakhand) ऋषिकेशमध्ये शोएब (Shoaib) नावाच्या एका तरुणाने शुभम बनून एका हिंदू महिलेशी मेसेज करत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला इस्लाम धर्म (Conversion) स्विकरण्यास जबरदस्ती केली. महिलेने प्रश्न विचारताच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर हिंदू महिलेने याबाबत आपल्या पतीकडे तक्रार केली. ज्यानंतर शोएबला हिंदू संघटनांनी चांगलाच चोप दिला.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशमधील व्यापारी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि त्यांची पत्नी शहरातील एका जिममध्ये व्यायामासाठी जात होते. तिथे शोएब नावाचा एक तरुणही येत होता. शोएबने(Shoaib) अंदाजे २० दिवसांपूर्वी व्यापारी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal)यांच्या पत्नीला आपले नाव शुभम सांगितले आणि मेसेज करण्यास सुरुवात केली. (Conversion)

( हेही वाचा : AAP सरकारचा दुटप्पीपणा; दिल्लीत फटाक्यांवर बंदी, पंजाबमधील प्रदुषणाकडे मात्र दुर्लक्ष

शोएबने (Shoaib)विशाल यांच्या पत्नीचा फोन नंबर मिळवला आणि फेक अकाऊंड तयार करत मेसेज केला. तो मेसेजमध्ये उलट-सुलट बोलत असे. यानंतर महिलेने शोएबला रोखण्याचा प्रयत्न केला असता तो अश्लील गोष्टी करू लागला. तसेच त्याने जिममध्ये ही महिलेसोबत छेडछाड केली. शोएबने महिलेवर धर्मांतर (Conversion)करण्यास दबाव टाकला. शेवटी कंटाळून महिलेने आपल्या पतीला (Vishal Agarwal)ही माहिती दिली. ज्यानंतर हे प्रकरण हिंदू संघटनांकडे पोहचले.

हिंदू संघटनेने एक दिवस शोएबला (Shoaib)पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर ऋषिकेशमध्ये शोएबची (Shoaib)मिरवणूक काढण्यात आली. त्याला चोप देत देत हिंदू संघटना ऋषिकेश कोतवाल पर्यंत आले. चौकशीत माहिती पडले की, शोएब ऋषिकेशचा रहिवाशी असून मंडीमध्ये काम करतो. दरम्यान शोएबवर (Shoaib) हिंदू संघटनांनी तक्रार दाखल केली आहे. हिंदू संघटनांनी आरोप केला आहे, अशा घटना वारंवार घडत असून पुन्हा अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. पोलिसांनी शोएबविरोधात छेडछाड करण्याचा आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.