आमदार Mihir Kotecha यांच्या नावाने कोण करतंय बेकायदेशीर वसुली

132
आमदार Mihir Kotecha यांच्या नावाने कोण करतंय बेकायदेशीर वसुली
  • प्रतिनिधी

मुलुंडचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या नावाने एका अनोळखी विदेशी मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीकडून वसुली सुरू आहे. अज्ञात व्यक्तीकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर वसुलीमुळे कोटेचा यांनी एका व्हिडीओद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, हा सायबर फसवणुकीचा भाग असून नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि माझ्या नावाने पैसे मागणाऱ्यांना पैसे पाठवू नये असे आवाहन कोटेचा यांनी केले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची नेमकी ‘रणनीती’ काय?)

मुलुंड विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांचे नाव टाकून एका विदेशी क्रमांकावरून लोकांना मेसेज केले जात आहे, “मै तकलीब मे हु, मुझे मदत करो” असा मेसेज करून एक लिंक मेसेज मध्ये देण्यात आली आहे, या लिंक वर पैशाची मागणी करण्यात येत आहे. या प्रकारचे मेसेज कोटेचा यांच्या निकटवर्तीयांना पाठविण्यात आले आहे, काही जणांनी थेट मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांना संपर्क साधून या मेसेजची कल्पना दिली.पैशाची मागणी करणारा अज्ञात व्यक्ती विदेशी मोबाईल क्रमांकाचा वापर करून तो क्रमांक मिहीर कोटेचा यांच्या नावाने सेव्ह करून एक मेसेज तयार करण्यात आला असल्याचे लक्षात येताच कोटेचा यांनी तात्काळ या मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली असता हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला; शपथ घेतली आणि ८ दिवसांत मोडली)

दरम्यान मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून “मी कुठल्याच अडचणीत नसून, माझ्या नावाचा वापर करण्यात येत आहे, नागरिकांना विनंती आहे की, हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे, कोणीही या लिंक वर आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन मिहीर कोटेचा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.