
पुणे रेल्वे स्टेशनवरील (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब (Pune Crime) ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला होता. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे वय 40 असून तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा-“…मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?” Eknath Shinde यांचा शरद पवारांना सवाल
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला (दि.८) सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २वर बॉम्ब ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक २वर तपासणी केली. मात्र त्याठिकाणी तसे काही आढळून आले नाही. (Pune Crime)
हेही वाचा-रशिया-युक्रेनमध्ये भारताच्या माध्यमातून चर्चा; S. Jaishankar यांची माहिती
फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढल्यानंतर तो पिंपरी-चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याचे समजले. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Pune Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community