Baba Siddique यांच्या हत्येसाठी मागण्यात आले होते १ कोटी

173
Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव
  • प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येची सुपारी राम कनोजिया याला देण्यात आली होती, या कामासाठी त्याने १ कोटी रुपयांची मागणी केली होती अशी धक्कादायक कबुली अटक करण्यात आलेल्या राम कनोजिया याने दिली. कनोजियाच्या म्हणण्यानुसार, फरारी संशयित शुभम लोणकर याने सुरुवातीला या सुपारीसाठी त्याच्याशी संपर्क साधला होता, बाबा सिद्दीकी यांचे राज्यातील राजकीय वजन बघून या कामासाठी १ कोटी रुपये मागितले होते अशी माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. दरम्यान अटक आरोपींपैकी एका संशयिताच्या मोबाईल फोनमध्ये मिळून आलेल्या आमदार झिशान सिद्दीकी यांच्या फोटोमुळे आणखी खळबळ उडवून दिली आहे.

(हेही वाचा – Mahayuti तील उमेदवारांची पहिली यादी पुढील आठवड्यात)

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी कर्जत, पनवेल आणि डोंबिवली येथून पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी राम कनोजि याचा समावेश आहे. राम कनोजिया हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत राम कनोजिया याने धक्कादायक अशी माहिती पोलिसांना दिली, फरार असणाऱ्या संशयित शुभ लोणकरने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी सर्वात प्रथम राम कनोजियाला संपर्क साधला कनोजिया हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. त्याला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे परिणाम माहित होते, त्यामुळेच तो कंत्राट घेण्यास टाळाटाळ करत होता.

(हेही वाचा – निवडणुकीआधी CM Eknath Shinde उमेदवारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार)

यामुळे त्याने या कामासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली, असे गुन्हे शाखेने सांगितले. त्यानंतर, लोणकरने उत्तर प्रदेशातून शूटर्सला नेमण्याचा निर्णय घेतला. कनोजिया यांनी पुढे नमूद केले की लोणकरला विश्वास होता की उत्तर प्रदेशातील व्यक्तींना महाराष्ट्रात सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या महत्त्वाची पूर्ण माहिती नसेल आणि ते कमी पैशात हे काम करतील. त्यानंतर लोणकर याने मोहम्मद जिशान अख्तरच्या माध्यमातून या हत्येसाठी उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप, गुरनैल सिंग आणि शिवकुमार गौतम यांना कामावर घेतले. शुभम लोणकर आणि इतर दोन संशयित शिवकुमार गौतम आणि झीशान अख्तर यांना लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, ज्यांना नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.