Narcotics Control Bureau : बदलापुरातील एमडीचा कारखाना मुंबई नारकोटिक्स विभागाकडून उद्ध्वस्त

123
Narcotics Control Bureau : बदलापुरातील एमडीचा कारखाना मुंबई नारकोटिक्स विभागाकडून उद्ध्वस्त
Narcotics Control Bureau : बदलापुरातील एमडीचा कारखाना मुंबई नारकोटिक्स विभागाकडून उद्ध्वस्त
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने (Ghatkopar Unit) बदलापूर येथे ‘मफेड्रोन’ (एमडी) हा अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीवर छापा टाकून लाखो रुपयांचा कच्चा मालासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चार जणांपैकी एक जण केमिकल इंजिनिअर असल्याची माहिती एएनसी ने दिली आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थाची ८२ लाख रुपये किंमत असल्याची पोलिसांनी सांगितले.  (Narcotics Control Bureau)
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळालेली माहिती अशी होती की, मुंबईतील ड्रग्स पेडलर्स (अमली पदार्थ विक्रते) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) शहरापासून काही अंतरावर असलेल्या वांगणी येथून मफेड्रोन हा अमली पदार्थाचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान घाटकोपर युनिटने मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स यांना अटक करून त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीत वांगणी येथे तयार होणाऱ्या एमडीच्या फॅक्टरीची माहिती घाटकोपर युनिटला मिळाली होती. (Narcotics Control Bureau)
या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने वांगणी येथे छापा टाकून चार जणांना ताब्यात घेऊन मफेड्रोन (एमडी) तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच १०६ ग्राम तयार एमडी जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी एक जण केमिकल इंजिनियर असून एमडी तयार करणाऱ्या कारखान्यात तो उत्पादन व्यवस्थापक होता. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि अधिक तपशील आणि कनेक्शन उघडकीस आणत आहेत. (Narcotics Control Bureau)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.