Nanded मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी

125
Nanded मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी
Nanded मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी

तीर्थ यात्रेला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. भरधाव ववेगाने जात असलेल्या कंटेनरची धडक बसल्याने ट्रॅव्हल्समधील २० भाविक जखमी झाले. यातील पाचजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नरसी-नायगांव महामार्गावर हा अपघात घडला. भाजप आमदार राजेश पवार यांनी मतदार संघातील मतदारांसाठी तीर्थ यात्रेची योजना आखली होती. (Nanded)

(हेही वाचा-Saptashrungi Gad चार दिवस भाविकांसाठी राहणार बंद)

मतदार संघातील एक हजार भाविकांसाठी २२ ट्रॅव्हल्स आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ४० महिला आणि पुरुष (एम. एच. १२ एफ सी ९०१७) हे एका ट्रॅव्हल्समधून बीड जिल्हातील कपिलाधार येथील मन्मथ स्वामीच्या दर्शनाला निघाले. नरसी-नायगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरून बाहेर येत असताना भरधाव वेगाने कंटेनरने ट्रॅव्हल्सला धडक दिली. या धडकेनेनंतर ट्रॅव्हल्समध्ये खिडकीला बसलेली एक चिमुकली बाहेर पडली. (Nanded)

(हेही वाचा-AI म्हणजे अमेरिका-इंडिया; जगाची नवीन ताकद; PM Narendra Modi यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडली नवी संकल्पना)

या अपघातात तुकाराम संतराम इबितवार (वय २५), पांडुरंग नागोराव इबितवार (वय २८), सानवी विश्वनाथ लालवंडे (वय ७), विश्वनाथ अशोक लालवंडे (वय २८), महानंदाबाई शिवराज भुरे (वय ४०), लक्ष्मीबाई भुरे (वय ५०), दत्ता लालवंडे (वय ६२), राजेंद्र संभाजी होनराव (वय ५६), रमेश निळकंठ टोंपे, हावगीरराव पिडकोरे (वय ६२), स्वाती विश्वनाथ लालवंडे (वय २७), अंजनाबाई पिंडकोरे, हनमंत लालवंडे (वय ३५), पार्वतीबाई शिवशाम भुरे (वय ४५), बसवदे गोविंद (वय ६०), दिव्या लालवंडे (वय १२), इंदरबाई संभाजी लालवंडे (वय ८०), सुमन डाकोरे (वय ६०), शंकर काशीनाथ भुरे (वय ६०) अदिसह अन्य एक असे २० प्रवासी जखमी झाले. अनेकांना हातापायाला मार लागला. आठ जणांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Nanded)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.