Nagpur Crime: ‘चल तुला चॉकलेट देतो’, असं सांगुन शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार!

225
Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक
Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक

कोलकाता, बदलापुर आणि पुणे पाठोपाठ आता नागपुरमधील (Nagpur Crime) अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी धनीराम वासनिक याला बेड्या ठोकल्या आहेत.

चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
चल तुला चॉकलेट देतो, असं सांगत आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेलं आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. एवढंच नाहीतर आरोपीनं पीडित मुलीला आपल्या घरी नेऊन दुष्कृत्य केलं आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी घाबरली आणि तिथून निघून आली. घाबरलेल्या मुलीने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. (Nagpur Crime)

पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने आरोपीला गाठलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी पोलीस कोठडीत असून त्याला कठोर शिक्षा व्हावी म्हणून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Nagpur Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.