Nagpur Bus Accident: नागपूरमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जण जखमी

113
Nagpur Bus Accident: नागपूरमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जण जखमी
Nagpur Bus Accident: नागपूरमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जण जखमी

नागपूरमध्ये ५ सप्टेंबरला बस आणि ट्रकच्या (Nagpur Bas and Truck Accident) धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. नागपूर-उमरेड मार्गावर भिवापूरजवळ हा भीषण अपघात झाला. मृत व जखमींची नावे अजून कळू शकलेली नाही. (Nagpur Bus Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने समोरून खासगी बसला धडक दिली. ज्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. चालक भरधाव वेगाने बस चालवत असताना हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची टक्कर इतकी जोरदार होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे दाबला गेला आहे. प्राथमिक तपासानुसार, अतिवेग आणि ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे.  

(हेही वाचा – CM Eknath Shinde : आठ देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मान्यता )

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरुन हटवण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Nagpur Bus Accident)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.