Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार

255
Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार
Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार

मुंबईत ओशिवरा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने (Mumbai Crime) पुन्हा एकदा शहराला हादरवले आहे. एका ३७ वर्षीय सुरक्षारक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. ही घटना संतापजनक आहे आणि यामुळे आता समाजाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

(हेही वाचा –Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षारक्षकाने मुलीला जबरदस्तीने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार केली, ज्यावर तात्काळ कारवाई करत ओशिवरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा –Kolkata Doctor Rape And Murder Case: ‘सेमिनार हॉलच्या दाराची कडी आतून…’ CBI ची धक्कादायक माहिती)

ही घटना बदलापूरमधील (Badlapur School Girl Rape Case) शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचार आणि कोल्हापूरमध्ये १० वर्षीय मुलीच्या बलात्कारानंतर महाराष्ट्रभरात या घटनांनी संतापाची लाट उसळली आहे. समाजात विकृत मानसिकतेचे वाढते प्रकार पाहता, लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना गंभीर चिंतेचा विषय बनल्या आहेत. या घटना केवळ कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे दाखवतात. पण समाजातील प्रत्येकाने अशा विकृत मानसिकतेच्या प्रवृत्तींविरुद्ध जागरूकता आणि सतर्कता वाढवण्याची गरजही आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनीही सावधगिरी बाळगून आपल्या परिसरातील असुरक्षिततेविरुद्ध एकत्रित आवाज उठवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सामाजिक संघटनांनी म्हटले आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.