जिरीबाममध्ये सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर 16 नोव्हेंबरपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या. या चकमकीत 10 दहशतवादी मारले गेले. यानंतर अतिरेक्यांनी मदत शिबिरातून मैतेई (Maitei) कुटुंबातील सहा जणांचे अपहरण केले. काही दिवसांनी त्यांचे मृतदेह मणिपूर आणि आसाममधील जिरी आणि बराक नद्यांमध्ये सापडले. या पार्श्वभुमीवर इम्फाळ (Imphal) आणि जिरीबाममधील (Jiribam) शाळा आणि महाविद्यालये १३ दिवस बंद राहिल्यानंतर शुक्रवारी (२९ नोव्हें.) पुन्हा सुरू होणार आहेत. (Manipur violence)
हेही वाचा- Crime News: मृत्यूनंतर 11 दिवस मुलाला ठेवले व्हेंटिलेटरवर, 6 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
शिक्षण संचालनालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, बाधित जिल्ह्यातील सर्व सरकारी, अनुदानित, खाजगी आणि केंद्रीय शाळांमध्ये शुक्रवारपासून वर्ग सुरू होतील. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारपासूनच सर्व शासकीय अनुदानित महाविद्यालये आणि राज्य विद्यापीठे सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तथापि, इम्फाळ खोरे आणि जिरीबाममध्ये प्रतिबंधात्मक आदेश अजूनही लागू राहतील. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर संचारबंदी शिथिल केली जाईल की नाही, हे अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. (Manipur violence)
हेही वाचा- अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं ? Eknath Shinde म्हणाले…
हिंसाचार भडकल्यानंतर इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, ककचिंग, कांगपोकपी, चुराचंदपूर, जिरीबाम आणि फेरझौल या नऊ जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि डेटा सेवा बंद होत्या. (Manipur violence)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community