Mahim Crime : माहीम पोलीस वसाहतीत चोरट्याचा एका रात्रीत १३ घरांवर डल्ला

114
Mahim Crime : माहीम पोलीस वसाहतीत चोरट्याचा एका रात्रीत १३ घरांवर डल्ला

माहीम पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस कॉलनीतील पोलिसांच्या बंद घरांवर चोराची वक्रदृष्टी पडली आहे. या चोरट्याने एकाच रात्रीत पोलीस कॉलनीतील १३ बंद घरामध्ये घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. दिवसा घरांची रेकी करून मध्यरात्री चोऱ्या करणारा हा चोरटा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून लवकरच त्याला बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती माहीम पोलिसांनी दिली आहे. (Mahim Crime)

(हेही वाचा – Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न!)

माहीम पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांची एका चोरट्याने झोप उडवली आहे. या चोरट्याने गेल्या आठवड्यात माहीम पोलीस वसाहतीत असलेल्या १३ बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरी करून पोबारा केला आहे. हा प्रकार गावावरुन परतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आला, त्याच्या घराप्रमाणेच इतर १३ बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे. (Mahim Crime)

(हेही वाचा – Badlapur School Case : अखेर सहा तासांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना लाठीचार्ज करून पांगवले)

याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या चोरट्याने पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू तसेच देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीस गेल्या आहेत. पोलिसांच्या घरांसह प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयाला देखील चोराने लक्ष्य केले आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना देखील चोरट्याने लक्ष्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३२४ (४) आणि ३०५ अन्वये अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mahim Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.