Love Jihad : आशिक अन्सारीने केले हिंदू तरुणीचे अपहरण आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती

130
Love Jihad : आशिक अन्सारीने केले हिंदू तरुणीचे अपहरण आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती
Love Jihad : आशिक अन्सारीने केले हिंदू तरुणीचे अपहरण आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपुर परिसरात आणखी एक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. इथे मुस्लिम तरुण आशिक अन्सारीवर आरोप आहे की, एका हिंदू तरुणीला फुस लावून त्याने तिची अपहरण केले आणि धर्मांतर करण्यास जबरदस्ती केली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. ज्यामुळे गावात पोलिसाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून तरुणीचा ही सापडलेली नाही. (Love Jihad)

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बिथरी चैनपुर पोलिस ठाण्यात १८ वर्षीय तरुणी दि. १४ ऑक्टोबर रोजी घरातून काही कामानिमित्त बाहेर गेली. मात्र बराच वेळ ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पीडितेच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. थोड्यावेळाने कळले की, गावातील तरुण आशिक अन्सारीने फुस लावून तरुणीला पळवून नेले होते. तरुणीच्या वडीलांटे म्हणणे आहे की, माझी मुलगी लव्ह जिहादची शिकार ठरली आहे आणि आशिकने तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. (Love Jihad)

( हेही वाचा : Onion Express Train : कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी लासलगावहून ‘कांदा एक्स्प्रेस’ थेट दिल्लीला रवाना

पीडितेच्या कुटुंबियांना आरोप केली की, आशिक अन्सारीच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी मिळून पीडितेचे अपहरण केले. तरुणी घरातून जाताना काही सोन्याचे दागिणे आणि १० हजारांची रोखरक्कम घेऊन गेली आहे. तरुणीच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले की, माझी मुलगी लव्ह जिहादची (Love Jihad) शिकार ठरली आहे. तसेच त्यांनी संशय व्यक्त केला की, तिचे ब्रेनवॉश सुद्धा करण्यात आले आहे.

या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू संघटनांनी या घटनेचा विरोध केला असून तरुणीला पुन्हा वडीलांना सोपवण्याची मागणी केली आहे. गावातील लोक पण या घटनेमुळे आक्रमक झाले असून हिंदू संघटनांनी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी आशिक अन्सारी आणि त्याच्या कुटुंबियांवर अपहरण आणि धर्मांतरचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा तपास सुरु असून गावातील तणावपूर्ण वातावरण पाहता पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Love Jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.