Kolkata Doctor Murder Case: संजय रॉयचे सायको ॲनालिटिकल प्रोफाइल आलं समोर; कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही

130
Kolkata Doctor Murder Case: संजय रॉयचे सायको ॲनालिटिकल प्रोफाइल आलं समोर; कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही
Kolkata Doctor Murder Case: संजय रॉयचे सायको ॲनालिटिकल प्रोफाइल आलं समोर; कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही

कोलकाता (Kolkata Doctor Murder Case) येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयची (Sanjay Roy) सीबीआयने सायको ॲनालिटिकल प्रोफाइल (Psychoanalytic Profile) केले. त्याचे जे निकाल समोर आले आहेत, ते अत्यंत धक्कादायक आहेत. संजय रॉय हा दिसायला जरी साधा व्यक्ती दिसत असला तरी तो एक लैंगिक विकृती असलेली व्यक्ती आहे. मनोविश्लेषकांचे एक पथक संजय रॉयची चौकशी करण्यासाठी आले होते. टीमने त्याच्याकडे चौकशी केली असता यावेळी त्याची एक अशी बाजू समोर आली जी कोणालाही माहिती नव्हती.

(हेही वाचा –Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल)

संजय रॉयला त्याच्या वागणुकीबाबत कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नव्हता. त्याने अत्यंत सामान्यपणे घटनेच्या दिवसाचे वर्णन केले. सीबीआयच्या तपासात सामील झालेल्या तज्ञांनी पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक निष्कर्षांशी मॅच करण्यासाठी एजन्सीला दिलेली त्याची विधाने देखील स्कॅन केली. सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घेण्यापूर्वी पोलिसांनी हे जाहीर केले होते की, पीडितेच्या नखात सापडलेलं रक्त आणि त्वचा या संजय रॉयच्या हातावरील जखमांशी जुळतात. (Kolkata Doctor Murder Case)

(हेही वाचा –Badlapur abuse case प्रकरणी आरोपी अक्षयच्या आई-वडिलांचा दावा काय?)

चौकशीदरम्यान संजय रॉयने दावा केला की, तो संध्याकाळी वॉर्डात आला होता. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता इतर ज्युनियर डॉक्टरांसोबत डिनरसाठी वॉर्डमधून बाहेर पडली आणि ९ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजेनंतर ती सेमिनार हॉलमध्ये गेली. त्यानंतर अडीच वाजता एक ज्युनियर डॉक्टर हॉलमध्ये आला आणि पीडिता झोपण्यापूर्वी त्याच्याशी काहीतरी बोलली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे ४ वाजता रॉय पुन्हा हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, तो तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये गेला. जिथे पीडिता आराम करत होती. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केले. (Kolkata Doctor Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.