Kolhapur Rape Case : कोल्हापूर पुन्हा हदारलं! पगारवाढीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

368
Kolhapur Rape Case : कोल्हापूर पुन्हा हदारलं! पगारवाढीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Kolhapur Rape Case : कोल्हापूर पुन्हा हदारलं! पगारवाढीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूरमध्ये महिला आत्याचारांच्या (Kolhapur Violence against women) घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच कोल्हापूर येथे नॉव्हेल्टी दुकानात (Kolhapur Novelty Shop Sexual Assault) काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दुकान मालक आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला असून, दाम्पत्यास अटक करण्यात आली आहे. (Kolhapur Rape Case)

लक्ष्मीपुरी पोलिसांनी (Laxmipuri Police) दिलेल्या माहितीनुसार, दुकान मालक यासीर नासीर पटवेगार (Shop owner Yasir Nasir Patwegar) (वय ३१) आणि त्याची पत्नी रुकैय्या यासीर पटवेगार (Ruqaiya Yasir Patwegar) (वय ३१) हे दाम्पत्य कोल्हापूर येथील सोमवार पेठ येथे वास्तव्यास होते. पीडित मुलगी मे २०२४ पासून यासीर पटवेगार याच्या लक्ष्मीपुरी येथील लुगडी आळ परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करीत होती. यासीर हा तिला पगार वाढविण्याचे आमिष दाखवून कपिलतीर्थ मार्केट येथील लॉजमध्ये घेऊन गेला. लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलीने दुकानातील काम बंद केले.

(हेही वाचा – सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; CM Eknath Shinde यांनी काढले गौरवोद्गार)

हा प्रकार जून ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. या दाम्पत्यांनी पीडित तरुणींच्या घरी जावून तिला दमदाटी करत मारहाण केली. अखेर पीडित मुलीने तक्रार देताच संशयित यासीर पटवेगार याला पोलिसांनी अटक केली. (Kolhapur Rape Case)

 हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.