Kochi Airport: Air India च्या प्रवाशाला विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण? 

163
Kochi Airport: Air India च्या प्रवाशाला विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण? 
Kochi Airport: Air India च्या प्रवाशाला विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण? 

विमानतळावरुन कायम चांगल्या किंवा धक्कादायक बातम्या समोर येत असतात. आता देखील विमानतळावरील एक मोठी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे केरळमधील कोची विमानतळावर (Kochi Airport) एअर इंडियाच्या (Air India passenger) एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली आहे. हा प्रवासी कोचीहून मुंबईला जात होता. यावेळी विमानतळावरील एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीम (XBIS) चेकपॉईंटवर एका प्रवाशाने सीआयएसएफ जवानांना (CISF jawan) विचारलं की, “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का?” हे ऐकताच एकच खळबळ उडाली.  (Kochi Airport)

प्रवाशाच्या या विचित्र प्रश्नाने शेजारी उभ्या असलेल्या जवानांने तात्काळ कारवाई करत, त्या प्रवाशाला अटक करण्यात आले आहे. प्रवाशाची कसून तपासणी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. रिपोर्टनुसार, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल सक्वॅड (BDDS) प्रवाशाच्या सामानाचीही तपासणी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर विमान वेळेवर निघालं.

(हेही वाचा – पान-मसाल्‍याच्या जाहिराती करणारे मृत्‍यू विकतात; Actor John Abraham यांचे सडेतोड मत)

बॅगमध्ये काय सापडलं? 

प्रवाशाच्या बॅगेत काहीही सापडलं नसून बॅगेत बॉम्ब असल्याबाबत त्याने विनाकारण प्रश्न विचारल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युजर्स असंही म्हणत आहेत की, खूप वेळ असणाऱ्या तपास प्रक्रियेमुळे प्रवाशाने असा प्रश्न विचारला असावा. काही युजर्स या प्रवाशाविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बोलत आहेत. (Kochi Airport)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.