बेकायदेशीर विक्री झालेले शेकडो SIM Cards दहशतवादी संघटनांकडे असल्याचा संशय

74
बेकायदेशीर विक्री झालेले शेकडो SIM Cards दहशतवादी संघटनांकडे असल्याचा संशय
  • प्रतिनिधी 

मोबाईल सिम कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी एका वर्षात ३० हजार मोबाईल सिम कार्ड्स (SIM Cards) बेकायदेशीररित्या विकल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वर्षभरात विना केवायसी बेकायदेशीररित्या विकण्यात आलेल्या मोबाईल सिमची विक्री सायबर माफिया आणि देशविरोधी कारवाई करणाऱ्या संघटनांना विकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणा तपास करीत आहे.

(हेही वाचा – विधानसभेच्या पार्श्वभूमीवर BJP कडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान)

मुंबई सायबर पोलिसांनी गुरुवारी बेकायदेशीर सिम कार्ड्स विक्री प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात ५ जण दोन मोबाईल कंपनीचे कर्मचारी असून तिघे जण दुकानदार आहेत. या टोळीने कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न घेता केवळ ‘युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (यूपीसी कोड)’ च्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करून सायबर फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना मोबाईल सिमची (SIM Cards) विक्री करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Jharkhand Assembly Election : निवडणुकीच्या जाहीरनाम्यामुळे काँग्रेसची फजिती)

या टोळीने एक वर्षात ३० हजार मोबाईल सिम पोर्ट करून तसेच केवायसी न घेता विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. या टोळीने बेकायदेशीर विक्री केलेले तसेच पोर्ट केलेले मोबाईल सिम कार्ड (SIM Cards) पैकी शेकडो सिम कार्ड दहशतवादी संघटनानी विकत घेतले असल्याचा संशय असून या अनुषंगाने एटीएस तसेच केंद्रीय तपास यंत्रणाकडून तपास सुरू आहे. तपास यंत्रणांकडून बेकायदेशीर विक्री करण्यात आलेल्या मोबाईल सिम कार्ड ची माहिती मागविण्यात येत असून या माहितीच्या आधारे हे सिम कार्ड कोण वापरत आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.