आणखी किती मुली ‘Love Jihad’ ला बळी पडणार?

152
आणखी किती मुली 'Love Jihad' ला बळी पडणार?
आणखी किती मुली 'Love Jihad' ला बळी पडणार?
  • जगन घाणेकर

उरणमध्ये हल्लीच झालेल्या लव्ह जिहादच्या (Love Jihad) घटनेने सारा महाराष्ट्र हादरला आहे. २७ जुलैच्या पहाटे उरण कोर्टनाका पेट्रोल पंपाजवळ यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय मराठी तरुणीचा तिचे हात, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे उघड झाले. यशश्री हिच्या मुस्लिम प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले असून लव्ह जिहादचे (Love Jihad) आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

राज्यातील मराठमोळी मुलगी श्रद्धा वालकरची अशाच प्रकारे लव्ह जिहादमध्ये (Love Jihad) हत्या झाली होती. त्यानांतर १६ वर्षीय साक्षीची साहिल नावाच्या मुस्लिम तरुणाने भर रस्त्यात केलेल्या निर्घृण हत्येचा व्हिडिओच समाज माध्यमांतून समोर आला होता. या दोन्ही प्रकरणांनी सारा देश हादरला होता. आता उरणमध्ये आणखी एक हत्या झाल्याने राज्यातील वाढता लव्ह जिहाद जगासमोर आला आहे. कर्नाटकात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची लव्ह जिहादमध्ये हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात आणखी एक प्रकरण उघड झाल्याने वाढत्या लव्ह जिहादच्या (Love Jihad) षड्यंत्राविरोधात सरकार काही करणार आहे की नाही असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

(हेही वाचा – केंद्रीय मंत्री Amit Shah म्हणतात; २०२९ मध्ये पुन्हा…)

लव्ह जिहादचे रॅकेट

हिंदू तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे, त्या दरम्यान त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स बनवायच्या, त्यांना ब्लॅकमेल करायचे, त्यांच्याशी निकाह करायचा, मुले जन्माला घालायची आणि नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचे किंवा त्यांना देहविक्रय करायला भाग पाडायचे नाहीतर अरब राष्ट्रांत विकायचे आणि पुन्हा दुसऱ्या हिंदू तरूणीला जाळ्यात ओढण्याची तयारी करायची अशा प्रकारचे रॅकेट आज ‘लव्ह जिहाद’च्या नावाने देशभर सुरु आहे. काही जिहादी तरूणांना ७-८ वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातून अटक केली असता त्यांनी अन्य धर्मीय मुलींना जाळ्यात ओढण्याकरिता कशा प्रकारे पैसा पुरवला जातो, हे रॅकेट कसे काम करते, याचा पाढाच वाचला होता.

आंतरराष्ट्रीय किर्तीची नेमबाज तारा सहदेव हिलासुद्धा लव्ह जिहादला सामोरे जावे लागले होते. आजमितीला केरळ आणि कर्नाटक राज्यात लव्ह जिहाद (Love Jihad) इतक्या मोठ्या प्रमाणात फोफावला आहे, की केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहादची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुस्लिमेत्तर धर्मियांच्या वंशविच्छेदावर उठलेल्या या संकटाची भीषणता ओळखून उत्तर प्रदेश सरकारने राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा संमत केला. मध्यंतरी श्रद्धा वालकरची लव्ह जिहाद अंतर्गत हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातही हा कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. सरकारनेही कायदा करण्यास संमती दर्शवली असून कायद्याचे प्रारूपही तयार असल्याचे म्हटले जात आहे. एकगठ्ठा मताच्या लाचारीपोटी लव्ह जिहादकडे (Love Jihad) जाणीवपूर्वक डोळेझाक केली गेल्याने त्याची पाळेमुळे आज भारतभर पसरली आहेत.

(हेही वाचा – Hindu मतांसाठी भाजपा मुंबईतील ३६ मतदारसंघांत करणार चाचपणी)

लव्ह जिहादला बळी पडलेल्या तरुणीचे काय होते?

पोटच्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे, तिला शिकवावे, तिचे सर्व हट्ट पुरवावे आणि वयात आल्यावर तिच्यासाठी सुयोग्य वर शोधून तिचे कन्यादान करावे अशी प्रत्येक आई वडिलांची माफक इच्छा असते. अशी लाडाने वाढवलेली मुलगी कोणाच्या तरी फसव्या प्रलोभनांना फसते आणि आई वडिलांना झुगारून धर्मपरिवर्तन करते हे कोणत्याही आई वडिलांच्या काळजावर घाव करणारेच आहे. मुलीने स्वत:च्या मनाने निवडलेला जोडीदार तिला सुखाने नांदवणारा आहे हे कळल्यावर पालकांचा राग उणावतोही; मात्र आपली लाडकी मुलगी एका जिहादी संकटाला बळी पडली असून तिच्या आयुष्याची पुरती फरफट झाल्याचे ऐकून त्या आईबापाचे ह्रदय किती पिळवटून निघत असेल याचा विचार कोणी केला आहे का? देशभरातील अशा लाखो मुली या षडयंत्राला बळी पडल्या आहेत. त्यांचे पुढे काय झाले याचा एकाही माध्यमाने आजतागायत शोध घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचे धाडस सर्वांमध्ये नसते. त्यापैकी काही निमूटपणे अन्याय सहन करतात, तर काही कुंटणखाना हेच आपले घर मानून प्रतिदिन मरणयातना सहन करतात.

हिंदु मुलीने आणि तिच्या पालकाने सतर्क राहायला हवे!

भारतात हिंदु बहुसंख्य असूनही तत्कालीन सरकारने देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा घटनादत्त अधिकार असून फूस लावून, प्रलोभने दाखवून किंवा बळाचा वापर करून धर्मांतरण करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना लव्ह जिहादच्या (Love Jihad) अंतर्गत हिंदू मुलींना फूस लावून किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांचे धर्मांतरण केले जात आहे. पहिल्या पत्नी असतानाही दुसरी पत्नी करून हिंदू मुलींशी निकाह करून त्यांचा उपभोग घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडून सर्रासपणे दुसरा निकाह केला जातो. हिंदू मुलींना हिजाब घालण्यास, मांसाहार करण्यास भाग पाडले जाते. त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते.

(हेही वाचा – Wayanad Landslides नंतर पुन्हा पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील मसुदा जारी)

स्त्री स्वातंत्र्याचा आणि मानवाधिकाराचा ढोल पिटत हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीवर तोंडसुख घेणाऱ्या तथाकथित सुधारमतवाद्यांना वर्तमानात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींच्या आयुष्याची होत असलेली राखरांगोळी दिसत नाही की त्याकडे मुद्दामहून कानाडोळा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. लव्ह जिहादची एकामागोमाग एक प्रकरणे उघड होत असताना, तरुण सुशिक्षित मुली या षड्यंत्राला बळी पडून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होत असताना केंद्र सरकार याबाबत कायदा करून यावर प्रतिबंध आणण्यासाठी केव्हा प्रयत्न करणार आहे? आपल्या घरातील कोणी या षडयंत्राला बळी पडत नाही तोपर्यंत याची भयावहता लक्षात येत नाही. आज लव्ह जिहाद दारापर्यंत येऊन ठेपला आहे. एखादी मुलगी लव्ह जिहादला बळी पडत आहे असे लक्षात येताच ती आपली भगिनी आहे या भावाने तिला लव्ह जिहादची भयावहता लक्षात आणून दिली पाहिजे. जिहादी तरूणाची पोलिसांत रितसर तक्रार करून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले पाहिजे. हिंदूंच्या वंशवृद्धीवर घाव घालू पहाणाऱ्या लव्ह जिहादरुपी संकटाचा सनदशीर मार्गाने बिमोड करण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे ही काळाची गरज बनली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.