Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

257
Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्यातील कोरेगावपार्क परिसरात हिट अँड रन (Hit and run in Pune) केसची पुनरावृत्ती झाली आहे. या अपघातात रुउफ अकबर शेख (वय -21) याचा दुर्देविरीत्या मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला राहत्या घरातून अटक केली आहे. प्रदीप तयाल( वय 34 वर्षे ,रा. हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच चालक शेजारी बसलेली व्यक्ती गाडीत सिगारेट ओढताना प्रत्यक्षदर्शींनी पाहीला आहे. (Hit and run in Pune)

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून वाहनाचा क्रमांक प्राप्त करून त्यात मिळालेल्या मोबाईल नंबर वरून वाहनचालकचा पत्ता मिळाला त्यातून संबधित वाहनचालक आयुष प्रदीप तयाल (वय 34 ) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असुन सदरचे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर भा न्या स . 105,281, 125(a), 132 119,177,184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहे. (Hit and run in Pune)

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री 1.30 ते 1.35 वा सुमारास एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एम एच 12 एन ई 4464 कारचालकाने प्रथम ऍक्टिवा वरील तिघांना जोरात ठोसर मारली त्यात ते तिघे रस्त्यावर खाली पडले त्यांना किरकोळ मार लागला. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या टू व्हीलर चालक रुउफ अकबर शेख यास पाठीमागून ऑडी कारने जोरात धडक दिल्याने तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत नोबल हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात जखमी तरुणाचा मृत्यू झालेला आहे. सदरचा वाहनचालक अपघात करून पळून गेलेला होता. (Hit and run in Pune)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.