पाकिस्तानी मौलाना Habibullah Armani याचे वादग्रस्त विधान; म्हणाला “भारतातील हिंदूंना ठार करून…”

257
पाकिस्तानी मौलाना Habibullah Armani याचे वादग्रस्त विधान; म्हणाला
पाकिस्तानी मौलाना Habibullah Armani याचे वादग्रस्त विधान; म्हणाला "भारतातील हिंदूंना ठार करून..."

बांगलादेशाच्या (Bangladesh) गाझीपुरमध्ये हबीबुल्ला अरमानी (Habibullah Armani) नावाच्या एका पाकिस्तानी मौलानाचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौलाना हबीबुल्ला अरमानी (Habibullah Armani) याने हिंदू धर्मियांबद्दल वादग्रस्त विधान केले असून हिंदूंकडून समाजमाध्यमावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

( हेही वाचा : Indian Food इतर देशातील पदार्थांपेक्षा सर्वोत्तम; ‘WWF’च्या अहवालात नेमकं काय?

दरम्यान या व्हिडिओमध्ये मौलाना हबीबुल्ला अरमानी (Habibullah Armani) म्हणतो की, हिंदूंनो आणि पंडितांनो, लक्षात ठेवा. तुमच्या एका बाजूला बांगलादेश (Bangladesh) आहे, तर दुसर्‍या बाजूला पाकिस्‍तान. आम्ही तुम्‍हाला ठार करून तुमच्‍या मृतदेहांला कुत्र्यांच्‍या स्‍वाधीन करू, असे वादग्रस्त विधान मौलाना अरमानीने (Habibullah Armani) केले आहे.

त्यात सुरुवातीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदूंकडून संताप व्यक्त करत हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गाझीपुरमधील असल्याचे ही सांगितले जात होते. मात्र उत्तर प्रदेशातील गाझीपुर पोलिसांनी पुढाकार घेत, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नव्हे तर बांगलादेशातील (Bangladesh) गाझीपुरमधील असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच वारंवार हा व्हिडिओ प्रसारित केल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ही पोलिसांनी सांगितले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.