Govinda: अभिनेता गोविंदाला बंदुकीची गोळी लागली, रुग्णालयात दाखल

313
Govinda: अभिनेता गोविंदाला बंदुकीची गोळी लागली, रुग्णालयात दाखल
Govinda: अभिनेता गोविंदाला बंदुकीची गोळी लागली, रुग्णालयात दाखल

बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदा (Bollywood actor Govinda) जखमी झाला असून, परवानाधारक रिव्हॉल्व्हर (Licensed revolver) कपाटात ठेवत असताना गोळी लागली. गोविंदाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे. संबंधित घटना मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास घडली. गोविंदा सध्या आयसीयूमध्ये आहे. या घटनेबाबत रुग्णालयाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. (Govinda)

घटना कशी घडली?

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा (Govinda Manager Shashi Sinha) यांनी एक निवेदन जारी करून गोविंदा कोलकाता येथे जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यांची पत्नी सुनीता कोलकात्यात आहे. तो परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर जमिनीवर पडली असता, गोळी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी आता गोविंदाच्या पायातली गोळी काढली असून त्याची प्रकृती ठीक आहे. 

(हेही वाचा – Tadoba Tiger Reserve चे दरवाजे २ ऑक्टोबरपासून उघडणार)

सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदानेच त्यांना फोन करून संबंधित माहिती दिली. गोविंदाची मुलगी टीना सध्या रुग्णालयात आहे. पुढील दोन दिवस त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. विनोदी चित्रपट आणि नृत्यशैलीसाठी लोकप्रिय असलेला गोविंदा याच वर्षी मार्चमध्ये शिवसेनेत सामील झाला होता.   (Govinda)

(हेही वाचा – Tadoba Tiger Reserve चे दरवाजे २ ऑक्टोबरपासून उघडणार)

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हटले आहे. गोविंदाला अंधेरीतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.