Goregaon Hit And Run: मुंबईत पुण्यासारखी घटना! अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वराला चिरडलं  

106
Goregaon Hit And Run: मुंबईत पुण्यासारखी घटना! अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वराला चिरडलं  
Goregaon Hit And Run: मुंबईत पुण्यासारखी घटना! अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वराला चिरडलं  

भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पुन्हा एकदा वेगाचा कहर पाहायला मिळाला आहे. मुंबईतील गोरेगाव (Goregaon XUV Accident) परिसरात गुरुवारी भरधाव वेगात आलेल्या एसयूव्हीने कारने दूध विक्रीसाठी जाणाऱ्या २४ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. एसयूव्ही कार चालक अल्पवयीन तरुण चालवत होता. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास आरे कॉलनीत हा अपघात झाला. दुसरीकडे मुंबईतील वरळी आणि वर्सोव्यानंतर आता हिट अँड रनचे नवे प्रकरण समोर आले आहे. (Goregaon Hit And Run)

(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi महाराष्ट्रात; ७६००० कोटींच्या वाढवण बंदराचे करणार भूमिपूजन)

एसयूव्ही चुकीच्या बाजूने येत होती

चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका महिंद्रा स्कॉर्पिओने (Goregaon Hit And Run) नवीन वैष्णव (Navin Vaishnava) यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे नवीनचा मृत्यू झाला. आरोपी ड्रायव्हरचे वय १७ वर्षे आहे. त्यामुळे एसयूव्हीचा कार मालक इकबाल जिवानी (Iqbal Jiwani, xuv car owner) (४८) आणि त्याचा मुलगा मोहम्मद फाज इक्बाल जिवानी (२१) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर एसयूव्ही कार  विजेच्या खांबाला धडकली.  त्यानंतर  पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला पकडले. त्याला दुखापत झाली आहे. तो दारूच्या नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Goregaon Hit And Run)

(हेही वाचा –Ramakant Achrekar Statue : मुंबई क्रिकेटच्या पंढरीत, शिवाजी पार्कवर उभारणार रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा  )

एसयूव्हीने ऑटो-रिक्षा चालकाला चिरडले

यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या एका ऑटो-रिक्षा चालकाला एसयूव्हीने चिरडले होते. यामुळे त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना पहाटे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) चालक निखिल जावळे (३४) आणि त्याच्यासोबत असलेला शुभम डोंगरे (३३) घटनास्थळावरून पळून गेला. परंतु, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे त्यांना तीन तासांत पकडण्यात आले. घटनेच्या वेळी ते दारूच्या नशेत होते की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात नोंदणीकृत असलेले त्यांचे वाहन स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळाल्यानंतर शोधण्यात आले. (Goregaon Hit And Run)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.