प्रेयसीच्या भेटीसाठी Gangster Abu Salem आतूर, तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी टाडा न्यायालयाकडे केला अर्ज

166
प्रेयसीच्या भेटीसाठी Gangster Abu Salem आतूर, तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी टाडा न्यायालयाकडे केला अर्ज
  • प्रतिनिधी 

मुंबई ९३ साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमला (Gangster Abu Salem) तुरुंगातून बाहेर पडण्याची घाई झाली आहे. अबूची माजी प्रेयसीने नुकतीच त्याची नाशिकच्या तुरुंगात भेट घेतली आहे. प्रेयसीच्या भेटीनंतर अबुला बाहेर पडण्याची घाई झाली असून त्याने तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तुरुंगातून सुटण्याची नेमकी तारीख जाणून घेण्यासाठी विशेष टाडा न्यायालयात धाव घेतली आहे. अबू सालेमने टाडा न्यायालयात केलेल्या अर्जात दावा केला आहे की, २० जुलै रोजी त्याने नाशिक तुरुंगातील अधीक्षकांना पत्र लिहून तुरुंगात राहिलेल्या दिवसांची माहिती दिली होती. अंडरट्रायल कालावधीसह तुरुंगवासाचा एकूण कालावधी, तसेच दोषी ठरविण्याचा कालावधी आणि तो ज्यासाठी पात्र असेल त्या माफीचा विचार करून त्याने सुटकेच्या तारखेची माहिती देण्याची विनंती केली होती. त्याने अर्जात दावा केला की, त्याच्या विनंतीला प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

(हेही वाचा – मशिदीत जय श्रीराम म्हटल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत; Karnataka High Court चा निर्वाळा)

सालेमने (Gangster Abu Salem) अर्जात असा दावा केला आहे की, आपण २३ वर्षे आणि सात महिन्यांहून अधिक तुरुंगवास पूर्ण केला आहे. नाशिक मध्यवर्ती तुरुंगातून त्याची सुटका झाल्याची तारीख, तुरुंगवास पूर्ण झाल्यावर तुरुंग प्रशासनाला द्यावी किंवा त्याला अजून किती दिवस कारागृहात घालवावे लागतील याची माहिती द्यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली आहे. गुरुवारी दिनांक १० ऑक्टोबर रोजी अबू सालेमला नाशिकच्या तुरुंगात भेटण्यासाठी एक महिला आणि एक परदेशी व्यक्ती आली होती. सालेमला भेटण्यासाठी आलेल्या महिला आणि परदेशी नागरिकाची दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी चौकशी केली असता ही महिला अबू सालेमची माजी प्रेयसी असल्याची माहिती समोर आली.

(हेही वाचा – Don Abu Salem : डॉनला तुरुंगात भेटायला आलेली ‘वो कौन थी?’)

महिलेने पोलिसांकडे दावा केला आहे की, तिने सालेमला (Gangster Abu Salem) भेटण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला भेट देणारी महिला त्याची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे प्रेमसंबंध १५ ते २० वर्षांपूर्वीचे आहेत. अबू सालेमने याआधी तिच्याशी लग्न करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, पण त्याची विनंती फेटाळण्यात आली होती. ही महिला भेटून गेल्यावर अबू सालेम हा तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी खूपच उतावळा झाला आहे. त्यामुळे त्याने तुरुंगातून केव्हा बाहेर पडणारा असे न्यायालयाकडे विचारले आहे. न्यायालयाने आता सीबीआय आणि तुरुंग अधिकाऱ्यांना त्याच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले आहे. त्याची रिलीज डेट जाणून घेण्याचा सालेमचा (Gangster Abu Salem) हा दुसरा प्रयत्न आहे. १९९३ मधील बॉम्बस्फोट आणि १९९५ मध्ये मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी सालेमचे नोव्हेंबर २००५ मध्ये भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.