माजी आमदार Baba Siddique यांची गोळ्या झाडून हत्या; दोन हल्लेखोरांना अटक

338
माजी आमदार Baba Siddique यांची गोळ्या झाडून हत्या; तीन हल्लेखोरांना अटक
माजी आमदार Baba Siddique यांची गोळ्या झाडून हत्या; तीन हल्लेखोरांना अटक
काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर वांद्रे पूर्व (Bandra West) येथे खेरवाडी सिग्नल या ठिकाणी दोन जणांनी गोळीबार केल्याची घटना  शनिवारी रात्री घडली. या गोळीबारात बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोळीबार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण  फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पातुन त्यांच्यावर हल्ला झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. (Baba Siddique)
वांद्रे पश्चिम येथील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तसेच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) (अजित पवार )गटात गेलेले बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या हल्लेखोरांनी खेरवाडी सिग्नलवर तीन गोळ्या झाडल्या, या गोळीबारात बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  (Baba Siddique)
दरम्यान गोळीबार करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली असून एक जण हरियाणा आणि दुसरा उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.हे दोघे शार्प शूटर असून या दोघांना बाबा सिद्दीकीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघीजवळून एक पिस्तुल जप्त करण्यात आली असून तीन हल्लेखोर होते त्यापैकी एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Baba Siddique)
सूत्रांच्या म्हणण्यानुसार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावरील हल्ला एसआरएच्या वादातून झाला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत असले तरीही पोलिसांकडून याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी निर्मल नगर पोलीसानी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.