Drugs : दुबईत बसलेल्या सौदागराकडून भारतात नशेच्या व्यवसायासाठी आर्थिक रसद

119
Drugs : दुबईत बसलेल्या सौदागराकडून भारतात नशेच्या व्यवसायासाठी आर्थिक रसद

भारतात अंमली पदार्थ (Drugs) च्या बेकायदेशीर व्यवसायासाठी दुबई येथून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सांगली येथील कारवाई नंतर गुजरात एटीएसने भिवंडी येथे नुकत्याच केलेल्या कारवाईत दुबई कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. पाकिस्तान स्थित कराचीत दडून बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावरून या बेकायदेशीर धंद्याला भारतात खतपाणी टाकले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुजरात एटीएस पथकाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील नदी नाका येथील एका फ्लॅटवर छापा टाकून बॅरलमध्ये भरलेले १०.९ किलो सेमी-लिक्विड मेफेड्रोन (MD) आणि ७८२.२ किलो लिक्विड मेफेड्रोन (MD) जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ८०० कोटी रुपये आहे. हे ड्रग्ज बनवण्यासाठी ठेवलेले ग्राइंडर, मोटार, काचेचे फ्लास्क आणि हिटरही जप्त करण्यात आले असून दोघांना अटकही करण्यात आले. या प्रकरणी गुजरात एटीएसने मुंबईतील डोंगरी येथे राहणारे मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांना अटक करण्यात आली. या दोघांनी बेकायदेशीरपणे मेफेड्रोन तयार करण्यासाठी गेल्या ९ महिन्यांपासून महाराष्ट्रातील भिवंडी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने घर घेतले होते.

(हेही वाचा – Signal School : मुंबईत उभी राहते पहिली सिग्नल शाळा, वस्तू विकणाऱ्या आणि भिक मागणाऱ्या मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात)

अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी मोहम्मद युनूस हा दुबईला गेला होता. त्याला दुबईत एक व्यक्ती भेटली व त्या व्यक्तीने मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांनी बेकायदेशीरपणे मेफेड्रोन (MD) तयार करून त्याची विक्री करून आर्थिक लाभ मिळवण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्या व्यक्तीने अटक आरोपींना आर्थिक रसद पुरवत होते. दुबईतून आर्थिक रसद पपुरवठा करणाऱ्या व्यक्तीची माहिती आरोपी देत नसल्यामुळे ती व्यक्ती कोण आहे याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ पथकाने मार्च मध्ये सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे एका ड्रग फॅक्टरीवर छापा टाकून मेफेड्रोन (MD) उत्पादन युनिट चालवणारा मास्टर माईंड प्रवीण उर्फ ​​नागेश रामचंद्र शिंदे (३४) याला अटक करून २५३ कोटींचा एमडी हा ड्रग्स जप्त करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात या एमडीच्या कारखान्याला दुबई येथून आर्थिक पुरवठा होत असल्याचे समोर आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा सलीम डोला याचे नाव या ड्रग्स प्रकरणात समोर आले, सलीम डोला हा दुबईत असून तेथून हवाला मार्फत आर्थिक रसद पुरवत होता अशी माहिती समोर आली होती. डोला हा दाऊदच्या इशाऱ्यावर भारतात ड्रग्जचा (Drugs) बेकायदेशीर व्यापाऱ्यात पैशांची गुंतवणूक करीत असल्याचे माहिती सूत्रानी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.