Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत असे या साहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेचे नाव आहे.

22
Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आणखी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. (Lalit Patil) सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले आहेत. यापूर्वी दोन अधिकाऱ्यांसह नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. (Lalit Patil)

साहायक पोलीस निरीक्षक सविता हनुमंत भागवत यांच्यावर ससूनच्या १६ नंबर वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. असे असूनही त्यामध्ये कसूर केल्याचा ठपका पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांनी ठेवला आहे. ३० सप्टेंबर रोजी दिवसपाळी असतांनाही कर्तव्यावर हजर न रहाता केवळ अर्धा तास उपस्थित राहिल्यामुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली. त्यानंतर तो पसार झाला. कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित अनिल पाटील याला पळून जाण्याची संधी मिळाली, असे नमूद करत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Onion Prices : कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारी गोदामांत अतिरिक्त कांदा साठवण्याचा सरकारचा निर्णय)

सविता भागवत यांची नेमणूक मुख्यालयाच्या कोर्ट कंपनी युनिटमध्ये होती. त्यांना ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयात असलेल्य वार्ड क्र. १६ येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दिवसपाळी करीता देखरेख अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या बंदी आरोपीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. भागवत यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. त्या दुपारी १३.३० वाजता तेथून रवाना झाल्याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. देखरेख अधिकारी म्हणून पूर्ण दिवसपाळी कर्तव्य असतांना फक्त अर्ध्या तासाकरीता ससून हॉस्पिटल येथील वार्ड क्र. १६ येथे भेट दिल्याचे दिसून येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे बंदी आरोपी ललित पाटील याच्याकडे गुन्हे शाखेला दोन आय फोन मोबाईल फोन आढळून आले आहेत. तसेच एक व्यक्ती काळया रंगाची सॅक घेवून बंदी आरोपी ललीत पाटील याला भेटण्यास गेला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Lalit Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.