ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक

3

मुंबईच्या ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ईडीच्या तपासाची गोपनीय कागदपत्रे लिक केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. पुण्यातील व्यापारी मुलचंदानी यांना गोपनीय दस्तावेज दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.

माहितीनुसार, पुण्यातील सेवा विकास कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अमर मुलचंदानी हे मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. अमर मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरच्या संपर्कात ईडीच्या कार्यालयातील दोन कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील गोपनीय माहिती मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरला पुरवली असल्याचे समोर आले आहे. ईडीने कार्यालयातीलच दोन कर्मचारी आणि मूलचंदानी यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे.

दरम्यान मागील काही वर्षांपासून ईडीने राज्यासह देशातल्या अनेक बड्या नेत्यांवर कारवाई केली आहे. मात्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा नेहमीच आरोप होतो. सध्या तरी देशात सर्वांच्या नजरा ईडीच्या कारवाईवर लागलेल्या असतात. मात्र ईडीच्याच कार्यालयात कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत ईडीने अजूनपर्यंत कुठलाही अधिकृत तपशिल जारी केलेला नाही.

(हेही वाचा – पत्नीला भडकावतात म्हणून शेजाऱ्यांवर हल्ला; तीन ठार, दोघे गंभीर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.