Drugs : बँकॉकहून फूड पाकिटातून आले अंमली पदार्थ; तिघांना अटक

84
Drugs : बँकॉकहून फूड पाकिटातून आले अंमली पदार्थ; तिघांना अटक
  • प्रतिनिधी

फूड पाकिटे आणि धान्यांच्या पाकिटातून अंमली पदार्थांची (Drugs) तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार नुकताच मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे. सीमाशुल्क विभागाने बँकॉक येथून आलेल्या तीन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असणाऱ्या फूड पाकिटामधून गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. जप्त करण्यात आलेला गांजाची किंमत ५ कोटी असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Badlapur School Case: बदलापूर प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी )

युसूफ नूर आणि अब्दुल सबित आणि समीर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. युसूफ हा नवी दिल्ली येथे राहणारा असून साबीत आणि समीर हे केरळ राज्यातील रहिवाशी आहेत. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ नूर शनिवारी बँकॉकहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्या ट्रॉली बॅगची झडती घेतली असता, त्या बॅगेमध्ये कॉर्न फ्लेक्स, रोस्टेड कॉर्न, केक आणि नॉन-डेअरी क्रीमर अशा विविध खाद्यपदार्थांची १० पाकिटे असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. अधिकाऱ्यांनी ही पाकिटे कापली आणि त्यात ४.८९० किलोग्रॅम अंमली पदार्थ (Drugs) असलेली २० पाकिटे सापडली, हा अंमली पदार्थ गांजा असल्याचे समोर आले. जप्त करण्यात आलेल्या गांजा या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५ कोटी एवढी किंमत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

(हेही वाचा – Jitendra Awhad यांचा बलात्काऱ्याला पाठिंबा; ”मुलगी मरू दे, नाहीतर काही होऊदे”; ऑडिओ क्लिप व्हायरल…)

सीमाशुल्क विभागाने नूरकडे केलेल्या चौकशीत त्याने अधिकाऱ्यांना माहिती दिली की, विमानतळाबाहेर एक व्यक्ती वस्तू घेण्यासाठी येत आहे. त्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे एक पथकाने प्रवाशांसोबत विमानतळाबाहेर सापळा लावला, दरम्यान नूर कडून अंमली पदार्थांची v पाकिटे घेण्यासाठी आलेल्या समीर आणि अब्दुल सबित यांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी विमानतळाच्या आत नेण्यात आले, असे एका सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांच्या मोबाईल फोनची तपासणी आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हे दोघे अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचे चौकशीत समोर आले. युसूफ नूरने सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले की, तो एका महिलेच्या निर्देशानुसार बँकॉकला गेला होता, तिने त्याच्या परतीच्या प्रवासाची तिकिटे बुक केली होती आणि हॉटेलचे बुकिंग केले होते आणि आर्थिक फायद्यासाठी बँकॉकमधून भारतात काही वस्तूंची तस्करी करण्याचे निर्देश दिले होते. अंमली पदार्थांची यशस्वी डिलिव्हरी केल्याबद्दल नूरला १५ हजार रुपये दिले जाणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.