Gujarat Drugs Connection : गुजरातमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : ५ हजार कोटींचे कोकेन जप्त ; काय आहे संपूर्ण प्रकार ? 

210
गुजरातमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : ५ हजार कोटींचे कोकेन जप्त ; काय आहे संपूर्ण प्रकार ? 
गुजरातमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : ५ हजार कोटींचे कोकेन जप्त ; काय आहे संपूर्ण प्रकार ? 

आशियातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असलेल्या अंकलेश्वरमध्ये (Ankleshwar) पुन्हा एकदा अमली पदार्थांचा काळा व्यापार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांनी केंद्र सरकारच्या अंमली पदार्थांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आणि ‘ड्रग फ्री इंडिया’ (Drug Free India) मोहिमेअंतर्गत संयुक्त कारवाई सुरू केली होती. या कारवाई अंतर्गत अंकेश्वर येथून 5 हजार कोटी रुपयांचे 518 किलो कोकेन जप्त (Gujrat 518 kg cocaine seized) करण्यात आले. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महिपालपूरमधील तुषार गोयल नावाच्या व्यक्तीच्या गोदामावर छापा टाकला होता आणि 562 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक गांजाची खेप जप्त केली होती. (Gujarat Drugs Connection)

मिळालेल्या माहितीनुसार या सिंडिकेटकडून आतापर्यंत एकूण 1289 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १३ हजार कोटी रुपये आहे. या सिंडिकेटशी संबंधित एकूण 12 जणांना आता अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 7 जणांना दिल्लीतील मागील 2 छाप्यांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

दुबईतून कार्यरत असलेल्या या सिंडिकेटचा मास्टरमाईंड वीरेंद्र बसोया (Syndicate Mastermind Surendra Basoya) असे त्याहे त्याचे नाव आहे. दुबईत त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. पोलिसांनी बसोया यांच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकेन कधीच जप्त करण्यात आलेले नाही. गेल्या 12 दिवसांतील हे तिसरी छापेमारी असून, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

या सिंडिकेटशी संबंधित बहुतांश सदस्य एकमेकांना ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समन्वय साधत असत. संवादासाठी, प्रत्येक सदस्याला एक सांकेतिक नाव देण्यात आले होते. याशिवाय ड्रग्जची ही खेप दक्षिण अमेरिकन देशांतून सागरी मार्गाने गोव्यात आणल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर ते दिल्लीत आणण्यात आले.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : भाजपा उमेदवारांची नावे निश्चित…फडणवीस,बावणकुळे दिल्लीला रवाना; नेमकं कारण काय ? )

दिल्ली पोलीस 2 महिन्यांपासून प्लॅनिंग करत होते, दिल्ली-गुजरातमध्ये कोकेन पकडण्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होते. त्यानंतर पोलिसांना ड्रग्ज पुरवठ्याबाबत माहिती मिळाली. हे तस्कर दिल्ली आणि एनसीआरमध्ये या अमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.