ड्रग्स माफिया कैलास राजपूतचा उजवा हात शिराझीला अटक; राजपूतला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

19
ड्रग्स माफिया कैलास राजपूतचा उजवा हात शिराझीला अटक; राजपूतला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू
ड्रग्स माफिया कैलास राजपूतचा उजवा हात शिराझीला अटक; राजपूतला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ड्रग्स माफिया कैलाश राजपूतचा विश्वासू सहकारी अली असगर शिराझी याला सोमवारी अटक केली आहे. वर्षभरापूर्वी कैलास राजपूत याला आयर्लंडमध्ये अटक झाल्यानंतर शिराझी हा राजपूतचे बेकायदेशीर धंदे आणि आर्थिक व्यवहार सांभाळत होता. मुंबई पोलिसांकडून राजपूतच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

खंडणी विरोधी पथकाने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर केटामाईन या अमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता, त्यात अली असगर शिराझी हे नाव समोर आले होते. अली असगर शिराझी हा ड्रग्स माफिया कैलास राजपूतच्या अटकेनंतर भारतातील राजपूत याचे सर्व बेकायदेशीर धंदे आणि व्यवहार हाताळत होता. मुंबई पोलीस शिराझीच्या मागावर होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी शिराझीसह राजपूतच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध लुकआउट परिपत्रक (एलओसी) जारी केले होते. राजपूतला अटक झाल्यानंतर दोन महिन्यांपासून शिराझीच्या मागावर असणारे खंडणी विरोधी पथकाने अखेर सोमवारी शिराझी याला अटक केली. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिराझी हा युरोपीय राष्ट्रांमधील अंमली पदार्थांची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी कुरिअर सेवेचा वापर करीत होता, केटामाइनचे उत्पादन आणि वितरण करण्यात शिराझीचा मोठा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यतिरिक्त, शिराझी यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस होती, असेही सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचा – Auto Rikshaw Driver : कुंटनखान्यात विकायला आणणाऱ्या तरुणीची रिक्षा चालकाने ‘अशी’ केली सुटका)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास राजपूतसह शिराजीला यापूर्वी २०१३ मध्ये मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनडीपीएस कायदा १९८५ च्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली होती. मात्र, २०१४ मध्ये शिराजीची तुरुंगातून सुटका झाली. २०२० मध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने युनिटने पुन्हा एकदा त्याचे जवळचे सहकारी आणि ड्रग्स तस्करीच्या कटात सामील असलेल्या व्यक्तींना अटक केली होती.

शिराझी याची अटक ही महत्वाची मानली जात असून शिराझीच्या अटकेमुळे ड्रग्सचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान आर्यलँडमध्ये अटकेत असलेला ड्रग्स माफिया कैलास राजपूतला भारतात आणण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.